ठाणे : न्यायालयातूनच वकिलाची बॅग लांबवल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बार रूममध्ये शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. न्यायालयातील वकील न्यायालयात जाताना त्यांच्या बॅग्ज आणि अन्य सामान बार रूममध्ये ठेवून जातात.

Continues below advertisement


त्यामुळे नेहमीप्रमाणे शनिवारी वकील मनिषा चौधरी याची बॅग त्यांची बॅग बार रूममध्ये ठेवली आणि त्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी गेल्या. मात्र यावेळी एका वयोवृद्ध चोरट्याने बार रूममध्ये येऊन त्यांची बॅग उचलून पोबारा केला.


मात्र चोरीचा हा सगळा प्रकार बार रूममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला. या बॅगमध्ये मनिषा चौधरी यांचा जवळपास 5 ते 6 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रं होती. याप्रकरणी पोलिसांनी मात्र अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केला नाही.


गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणाऱ्या वकिलांच्याच बॅगा चोरी होऊ लागल्यानं वकील मात्र धास्तावले आहेत. मात्र सीसीटीव्हीच्या मदतीने ही चोरीही काही वेळातच उघड झाली.