...तर मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना राज्यात फिरकूही देणार नाही : मराठा क्रांती मोर्चा
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 27 Oct 2018 06:04 PM (IST)
मराठा समाजाला आरक्षणासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना राज्यात फिरकूही देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे. यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. आज मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चाची राज्यव्यापी बैठक पार पडली. यावेळी सरकारला हा अल्टिमेटम देण्यात आला आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर 20 नोव्हेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करू, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे.