Maratha Reservation Verdict : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध असल्याचा दिलेला निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रद्द ठरवला आहे. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाच्या या  निर्णयानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारकडून निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे तर दुसरीकडून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका आहे.  यादरम्यान मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आरक्षणाच्या चष्म्यातलं गलिच्छ राजकारण यापुढं होऊ दिलं जाणार नाही, असंही ते म्हणाले.


Maratha Reservation : इतर राज्यांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पाळली गेली आहे का?


एबीपी माझाशी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गुणवंत जे भीतीपोटी समोर येऊ शकत नव्हते त्यांनी ज्याप्रकारे मला आणि कुटुंबाला समर्थन दिलं, माझ्यासोबत उभे राहिले त्यांना मी शुभेच्छा देतो. हत्या झाली तरी खुल्या गुणवंतांसाठीची लढाई सुरु राहील असंही त्यांनी म्हटलं. 


Ashok Chavan on Maratha reservation : लढा संपलेला नाही, मराठा आरक्षणासाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा- अशोक चव्हाण


सदावर्ते म्हणाले की, महागडे पेहराव, बीएमडब्ल्यू गाड्यांमध्ये लोक जमलेले अशा प्रकारचा मोर्चा अपेक्षित नाही. समाजातून दूर राहिलेले अशी मराठ्यांची परिस्थिती नाही. दडपशाही चालणार नाही, ही राजेशाही नाही. ही पाटीलकी, देशमुखी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानप्रमाणे चालणारा देश आहे. आज संविधानाचा, सामान्यांचा विजय झाला आहे. या विजयाला कोणीही डिवचण्याचा प्रयत्न करु नये.


Maratha reservation : मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी, केंद्र सरकारने अंतिम निर्णय घ्यावा : मुख्यमंत्री


ते म्हणाले की, मराठा आरक्षण, 52 मोर्चे, बीएमडब्ल्यूमधून जमवलेले लाखो लोक, शरद पवारांच्या दिल्लीतील बैठका, संजय राऊतांची एंट्री, देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरणे, उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणणे याविरोधात खुल्या गुणवंतांची आणि संविधानची ही लढाई होती. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस जाहीर केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.


ते म्हणाले की, आरक्षणाच्या चष्म्यातील गलिच्छ राजकारण देशात आणि राज्यात होऊ नये आणि आम्ही होऊ देणार नाही. आमचा खून जरी झाला तरी खुल्या गुणवंतांसाठीची लढाई सुरु राहील. सुप्रिया सुळे, शरद पवार, मराठा संघटना, विश्वास नांगरे पाटील, मराठा पोलीस कर्मचारी, अधिकारी जे कोणी एकत्रित येऊन आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करतील त्यांना आमच्या मृत्यूनंतरही देश, राज्य जाब विचारेल, असं ते म्हणाले.