एक्स्प्लोर
Advertisement
किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या
अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव हे भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाशी साधर्म्य असल्यामुळे, परिसरात एकच चर्चा सुरु होती.
ठाणे: कारमधून अवैध गावठी दारु घेऊन जाणाऱ्याला वाहतूक पोलिसांनी पाठलाग करुन पकडलं. किरीट रामजीभाऊ सोमय्या असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव हे भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाशी साधर्म्य असल्यामुळे, परिसरात एकच चर्चा सुरु होती. पण त्याचा भाजप खासदार सोमय्या यांच्याशी काहीही संबंध नाही.
काय आहे प्रकरण?
कासारवडवली वाहतूक शाखा उपविभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. नाईक आणि त्यांचे पथक रविवारी संध्याकाळी गस्त घालत होते. यावेळी ते नागला बंदर इथे नियमबाह्य काळ्या काच असलेल्या वाहनांवर कारवाई करत होते.
त्यावेळी त्यांना एक काळी काच असलेली इंडिका कार दिसून आली. ती कार अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, कारचालक न थांबता पळून जाऊ लागला.
पोलिसांना संशय आल्याने वाहतूक पोलीस नाईक गर्जे, बसवराज पाटील आणि पोलीस शिपाई जाधव यांनी त्या कारचा पाठलाग करुन ती विजय गार्डन जंक्शन इथं अडवली.
पोलिसांनी या कारची तपासणी केली असता, त्यात ट्रकच्या ट्यूबमध्ये गावठी दारु भरलेली आढळून आली. पोलिसांनी ही दारु आणि कार जप्त केली असून, कारचालक किरीट रामजीभाई सोमय्याला अटक केली आहे.
चालक किरीट सोमय्या हा मुंबई येथील राहणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement