एक्स्प्लोर

EXCLUSIVE : मुलुंडचं गणेश मंदिर अनधिकृत, आरपीएफचा भांडाफोड

मुलुंड (मुंबई) : मुंबईतल्या सव्वा कोटी जनतेच्या श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा प्रकार घडला आहे. देवाला हाताशी धरून भक्तीचा बाजार मांडणाऱ्या आरपीएफचा एबीपी माझानं पर्दाफाश केला आहे. मुलुंड रेल्वे स्थानकाला लागून असलेलं प्रसिद्ध गणपती मंदिर अनधिकृत असल्याचं उघड झालं आहे. एवढंच नव्हे, तर  त्या मंदिरातली देणगी थेट आरपीएफ अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा आरोप होतो आहे. मध्य रेल्वेनं सीएसटीकडे जाताना मुलुंड रेल्वे स्थानकावरून दिसणारं एक गणपती मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केल्याशिवाय, एकही लोकल मुंलुंडवरून पुढे जात नाही. मात्र, याच मंदिरातला गणपती बाप्पा, एका मोठ्या घोटाळ्याचा सावज ठरला आहे. बी. आर. जोगदनकर नावाच्या प्रवाशानं वर्षभरापूर्वी मंदिराला दिलेल्या देणगीनंतर या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. संशय आल्यानं जोगदनकर यांनी माहिती अधिकारातंर्गत माहिती मिळवली आणि लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या आरपीएफचं पितळ उघडं पडलं. 1984 साली आरपीएफच्या आजी-माजी अधिकाऱ्यांनी बांधलेलं हे मंदिर अनधिकृत असल्याचं रेल्वे प्रशासनानंच कबूल केलं आहे. एवढंच नव्हे, तर गणपतीच्या नावाखाली आरपीएफ अधिकाऱ्यांकडून राजरोसपणे बेकायदा वर्गणी गोळी केला जाते आहे. मंदिराच्या कमिटीवर असणारे 10 ते 12 जण आरपीएफचे आजी-माजी अधिकारी असल्याचं समजतं आहे. कदाचित म्हणूनच, तक्रारीला वर्ष उलटूनही या प्रकरणी रेल्वे प्रशासन आणि आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई केली गेली नाही. मंदिराला देण्यात येणारी देणगी थेट आरपीएफ अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याचं समजतं आहे. कारण संस्थेचं पॅनकार्डही नाही आणि कोणती अधिकृत नोंदणीही नाही. गणपतीला हाताशी धरून, भक्तांचा खिसा खाली करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. कारण हा फक्त आर्थिक घोटाळा नाही तर लोकांच्या श्रद्धेशी केलेला खेळ आहे. आता केंद्रीय रेल्वे मंत्री या घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर कृपा दाखवणार का अवकृपा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट -

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain : एका बाजुला दुष्काळ! दुसऱ्या बाजुला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईत विमानसेवा विस्कळीत
एका बाजुला दुष्काळ! दुसऱ्या बाजुला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईत विमानसेवा विस्कळीत
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
मराठी माणसाला फसवलं! मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आणणारेच ढोंगबाजी करतायेत, ठाकरे बंधुंच्या मोर्चावर चित्रा वाघांचा हल्लाबोल  
मराठी माणसाला फसवलं! मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आणणारेच ढोंगबाजी करतायेत, ठाकरे बंधुंच्या मोर्चावर चित्रा वाघांचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
Embed widget