IIT - Placements : आयआयटी मुंबईचा प्लेसमेंट्सचा पहिला टप्पा 18 डिसेंबर रोजी पूर्ण झाला असून पहिल्या टप्प्यात विविध कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना तब्ब्ल एक हजार 723 जॉब ऑफर्स आल्या आहेत. त्यातील एक हजार 382 ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या आहेत. अशी माहिती मुंबई प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे. 


मागील वर्षांत प्लेसमेंटचा खाली गेलेला आलेख यंदा पुन्हा उंचावला आहे. 2019-20 साली विद्यार्थ्यांनी एक हजार 172 जॉब ऑफर्स स्वीकारल्या होत्या. त्यानंतर 2020- 21 मध्ये स्वीकारण्यात आलेल्या ऑफर्सची संख्या कमी झाली आणि ती 973 वर आली. मागील वर्षीपेक्षा यंदा आयआयटी मुंबई प्लेसमेंटमध्ये आलेल्या ऑफर्सची संख्या 595 ने अधिक आहे तर स्वीकारण्यात आलेल्या ऑफर्स 400 हून अधिक आहेत.


आयआयटीच्या पहिल्या टप्प्यात इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रात विद्यार्थ्यांना सर्वात जास्त ऑफर्स मिळाल्या आहेत. सगळ्यात मोठी ऑफर फायनान्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांना असून ती 28.40 लाख प्रतिवर्ष इतकी आहे. त्यानंतर आयटी / सॉफ्टवेअर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, कन्सल्टिंग अशा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे पॅकेजेस मिळाले असल्याची माहिती प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे. अशाप्रकारे पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना 1,172 जॉब ऑफर्स आल्या आहेत. त्यातील 1,382  विद्यार्थ्यांनी ऑफर्स स्वीकारल्या आहेत. 


प्लेसमेंट मिळालेल्या15 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे. एक हजार 172 पैकी 12 विद्यार्थ्यांना मोठी प्लेसमेंट मिळाली आहे. या 12 विद्यार्थ्यांना तब्बल वार्षिक एक कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. त्यामुळे आयआयटी प्लेसमेंटमुळे विद्यार्थी कोट्यधीश झालेत असा म्हणायला हरकत नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली प्लेसमेंट मिळाली आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. मात्र, सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे नोकरीची दारेही उघडली जात आहेत. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live



संबधित बातम्या : 
Job Majha : महाराष्ट्र लोक सेवा आयोग, NIFT आणि सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीची संधी
NIA Recruitment: एनआयएमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज 
Job Majha : भारतीय कृषी संशोधन संस्था, महाराष्ट्र वन विभाग आणि सैनिक स्कूल चंद्रपूरमध्ये नोकरीची संधी