Parag Sanghvi : बॉलीवूडमधील चित्रपट निर्माते पराग संघवी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.  पराग संघवी हे निर्माते असून ALUMBRA आणि लोटस फिल्म कंपनीचे सीईओ सुद्धा आहेत. तसेच k.sera sera कंपनीच्या एमडी पदावर ते आहेत. भूतनाथ रिटर्न्स, the attack of 26/11 सारख्या सिनेमाची निर्मिती संघवी यांनी केली आहे. 


काय आहे प्रकरण?


पराग संघवी हे ALUMBRA ग्रुपचे सीईओ आहेत आणि कमला ग्रुप ऑफ कंपनीची Alumbra कंपनी ही सिस्टर कंपनी आहे. कमला ग्रुप कंपनीने लोकांडून पैसे घेतले आणि ते पैसे amlubra, प्लेबॉय आणि आणखीन एका कंपनीमध्ये ते पैसे वळवले. एकूण 42 कोटी रुपये कमला ग्रुप ऑफ कंपनीजमधून बाकीच्या तीन कंपनीमध्ये ते वळवण्यात आले. प्लेबॉय आणि alumbra कंपनीमध्ये पराग संघवी हे डायरेक्टर पदावर आहेत. तर कमला ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर जितेंद्र जैन सुद्धा प्लेबॉय आणि अलंगुरा कंपनीमध्ये पराग संघवी सोबत डायरेक्टर आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने मध्ये पराग संघवी विरुद्ध एकूण पाच गुन्हे दाखल आहेत त्यापैकी एक पुण्यामध्ये पराग संघवीला अटक करण्यात आली आहे.


कमला कृपा कंपनीचे डायरेक्टर जितेंद्र जैन यांना सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती मात्र चार वर्षांच्या तुरुंगवासा नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. कमला ग्रुप ऑफ कंपनीज मे लोकांच्या पैशाचा अपहार केला आणि ते पैसे इतर तीन कंपनी मध्ये वळवले ज्यात पराग संघवी हे डायरेक्टर होते लोकांच्या पैशाचा अपहार झाला हे माहिती असून सुद्धा आपल्या कंपनीमध्ये पैसे वळून त्या पैशांचा वापर केल्याप्रकरणी पराग संघवीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे..


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha