NIA Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. या अंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासह विविध पदांची भरती केली जाईल. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना एनआयएच्या अधिकृत वेबसाईट  nia.nic.in ला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात. तसेच अर्जाची प्रक्रियाही समजून घेऊ शकतात. 


अधिसूचनेनुसार, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि पंचकर्म वैद्य यांच्या एकूण 18 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी उमेदवार पोस्टाद्वारे अर्ज करू शकतात. दरम्यान, अर्ज शुल्काचा कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्ट संलग्न करून डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जोरावर सिंग गेट, अजमेर रोड, जयपूर – 302002 येथे पाठवावं. तसेच, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात आलीय. 


- पंचकर्म वैद्य या एका पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवाराला 3500 रुपये जमा करावे लागतील. या पदासाठी उमेदवार एमडी असणे आवश्यक आहेत. तसेच या पदासाठी उमेदवाराचं वय 40 पूर्ण पाहिजे. 


- ज्युनिअर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्टचे एक पद रिक्त आहे. ज्यासाठी उमेदवाराला 2000 रुपये मोजावे लागतील. या पदासाठी 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी वयोमर्यादा 28 वर्षे असेल.


- कनिष्ठ लघुलेखक (हिंदी) चे एक पद रिक्त आहे. या पदासाठी दोन हजार रुपये अर्ज शुल्क आकरण्यात आलंय. विज्ञान विषयातून बारावी उत्तीर्ण आणि डीएमएलटी कलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी उमेदवाराचं वय, 28 वर्ष असावं. 


- ग्रंथालय सहायकाच्या एका पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी उतीर्ण आणि त्याच्याकडं ग्रंथालय विज्ञानाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदासाठी वयोमर्यादा 30 ठेवण्यात आलीय. 


- लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) ची तीन पदे भरली जाणार आहे. या पदासाठी उमेदवार 12वी उतीर्ण असावा. या पदासाठी उमेदवाराकडून दोन हजार अर्ज शुल्क आकरले जाईल. तसेच उमेदवाराचं वय 27 वर्ष असावं. 


- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या 11 पदांसाठी भरती केली जणार आहे. यासाठी उमेदवाराला 2000 रुपये शुल्कही जमा करावे लागेल. 10वी पास यासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी 25 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha