एक्स्प्लोर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तयारी पूर्ण झाल्यास, शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक - डॉ. समीर दलवाई

लहान मुलांचे लसीकरण जरी ऑक्टोबरपासून सुरू होत असले तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नसल्याचं डॉ. समीर दलवाई यांनी सांगितले. 

मुंबई : राज्यात एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना राज्यात शाळा नेमका कधी सुरू होणार? शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्सने राज्य सरकारला नेमक्या काय सूचना केल्या आहेत? याबाबत चाइल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दलवाई यांच्याकडून 'एबीपी माझा'ने जाणून घेतलं. 'शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जर तयारी पूर्ण झाली, तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स  सकारात्मक असल्याच डॉ. दलवाई यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. लहान मुलांचे लसीकरण जरी ऑक्टोबरपासून सुरू होत असले तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नसल्याचं डॉ. दलवाई यांनी सांगितले. 

शाळा सुरू करण्याबाबत, लहान मुलांच्या लसीकरण, डेल्टा प्लसचा मुलांना कितपत धोका आहे? अशा विविध मुद्यावर डॉ समीर दलवाई यांनी काय म्हटलं पाहूया.

प्रश्न- टास्क फोर्सच्या मते राज्यात शाळा नेमक्या कधी सुरू व्हायला हव्यात?
>> मुलांना संसर्ग होऊन त्यांना त्रास होऊ नये याचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जातोय. शाळेत मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग पालन करणे, शाळेत गर्दी होऊ नये यसाठी नियोजन करणे हे गरजेचं आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व अॅडल्ट आहेत त्यामुळे त्यांचे लसीकरण होणं किमान गरजेचा आहे. मुलांना कोविड झाला तर तो सौम्य असतो, प्रौढांना जर त्याचा संसर्ग झाला तो गंभीर स्वरूपाचा असतो. त्यामुळे प्रौढांचा लसीकरण व्हायला हवा

प्रश्न - शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स ने नेमक्या शिक्षण विभागाला काय सूचना केल्यात?
>> शाळा सुरू करण्यापूर्वी सुद्धा काही मुले ऑनलाईन काही मुले ऑफलाईन असे हायब्रीड मॉडेलचा अवलंब करावा लागणारआहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करताना लहान मुलांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. कारण दीड वर्ष लहान मुलं ही घरात होती. शाळा जरी सुरू करण्यात येतील तेव्हा सुरुवातीच्या काळात अभ्यास एका अभ्यास न करता विद्यार्थ्यांचा सोशल रिहॅबिलिटेशन करणे गरजेचे आहे. मुलांना कुठलाही प्रकारची धोका नसणार अशा प्रकारची तयारी करूनच, शाळा सुरू करावे लागणार. शाळा सुरू करताना शिफ्टनुसार मुलांना शाळेत बोलवावे लागेल.

प्रश्न - शाळा सुरू करणे आणि लहान मुलांचे लसीकरण याचा सबंध जोडता येईल का?
>> शाळा सुरू करण्याचा आणि लसीकरण सुरू होण्याचा कसलाच संबंध जोडता येणार नाही. हे दोन पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत. लशींचे आत्ताच क्लिनिकल ट्रायल झालेले आहेत, त्यानंतर आता हे लसीकरण सुरू करतोय. कारण लहान मुलांनी लस घेतली की लगेच ती इम्युन होतील, असा त्याचा अर्थ काढू शकत नाही. लसीकरण हे लाँग टर्मसाठी महत्त्वाचा आहे. 

प्रश्न - डेल्टा प्लसचा धोका लहान मुलांच्या बाबतीत कितपत पाहायला मिळू शकतो?
>> डेल्टा प्लसचा धोका जेवढा इतरांना आहे तेवढाच मुलांना आहे. मात्र त्यांच्या तुलनेत मुलांना धोका तसा कमी आहे. ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही किंवा जे इम्यून नाहीत ज्यांना आतापर्यंत इन्फेक्शन झालं नाही. त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. अनेक लहान मुलांना इन्फेक्शन झालेला आहे हे कळत सुद्धा नाही. काही मुलांना सौम्य इन्फेक्शन जाणवतं. तर अगदी कमी टक्का आहे ज्या मुलांना गंभीर इन्फेक्शनला सामोरे जावं लागतं

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget