Aaditya Thackeray on Mumbai Municipal Election: मुंबईत (Mumbai News) चारशे किलोमीटर्सच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल सहा हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या निधीच्या कामाला मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Election) प्रशासकानं मंजुरी देणं हा सर्व पक्षांच्या नगरसेवकांचा अपमान आहे, या शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी सत्ताधारी युतीचा समाचार घेतला. मुंबई महापालिकेचे (BMC Election) प्रशासक सध्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून आदेश घेतात, असा घणाघाती टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच, वाढत्या काँक्रिटीकरणामुळे मुंबईचा जोशीमठ (Joshimath) होऊ शकतो, असंही आदित्य ठारे म्हणाले आहेत. 


...तर या सगळ्याला जबाबदार कोण? : आदित्य ठाकरे 


मुंबईत काँक्रिटीकरण वाढलं आहे. दोन बिल्डिंग्सच्या मध्ये जी जागा असते, तिथेही काँक्रिटीकरण झालं आहे. जिथे मोकळी जागा किंवा मातीची मैदानं असायची, तिथेही काँक्रिटीकरण झालं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा पूर आले. मुंबईचा जोशीमठ झाला, तर या सगळ्याला जबाबदार कोण? कारण एवढं काँक्रिटीकरण हे आपल्याला परवडणारं नाही. कोणत्याही शहरात एवढं काँक्रिटीकरण होत नसतं. जगातलं कुठचंही शहर घ्या, काँक्रिटीकरण कुठेही 100 टक्के होत नाही."


पाहा व्हिडीओ : Aaditya Thackeray : मुंबईचा जोशीमठ झाला तर जबाबदार कोण? : आदित्य ठाकरे



निवडणुका घेण्याची हिम्मत नाही यांच्यात : आदित्य ठाकरे 


आदित्य ठाकरे म्हणाले की, "आता निवडणुका होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच काळापासून निवडणुका रखडल्या आहेत. निवडणुका घेण्याची हिम्मत नाही यांच्यात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, वसई-विरार अशा अनेक महानगरपालिका आहेत, जिथे निवडणुका होणं गरजेचं आहे. तिथे लोकप्रतिनिधी नाहीत. मुंबईत मी नगरसेवकांसाठी वेगळा दिवस ठेवायचो आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचो. कारण नगरसेवक खूप महत्त्वाचे असतात, त्यांचा वॉर्ड खूप मोठा असतो. त्यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. आमदार म्हणून सांगायचं झालं तर, अनेक कामं अशी असतात जी स्थानिक पातळीवर त्या कामांमध्ये आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही." 


जोशीमठमध्ये काय घडतंय? 


उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये घरांना आणि रस्त्यांना भेगा जात आहेत. तेथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होत आहे. जोशीमठमधून शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचत असल्यानं मोठे संकट निर्माण झालं आहे. तेथील घरे, रस्ते आणि शेतात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. 


जोशीमठ अजुनही खचत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरनं जोशीमठ शहराच्या सेटेलाईट इमेजेस प्रसिद्ध केल्या आहेत. या इमेजेसवरुन जोशीमठमध्ये जमीन खचण्याची प्रक्रिया कशी सुरू आहे, याचा अंदाज येतोय. जोशीमठ अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याचं सॅटेलाइट इमेजमधून दिसून आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यानं राज्यभरातील डॉक्टर्स नाराज; खुद्द उद्धव ठाकरेंची मध्यस्थी अन् गैरसमज दूर