मुंबई : राज्यात सध्या गारठा  (Temperature) वाढत आहे. मुंबईच्या वातावरणात  गारवा जाणवत असला तरी मुंबईतील हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून  सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही वाईट  स्थितीत आहे.  मुंबईचा  हवा गुणवत्ता निर्देशांक 306 वर तर दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 242 वर गेला आहे. 


मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक मागील काही दिवसात 300 पारच गेला आहे. आज मुंबईतील हवा गुणवत्ता अतिधोकादायक परिस्थितीत तर दिल्लीतील हवा गुणवत्ता धोकादायक श्रेणीत गेला आहे. मुंबईतील घटते तापमान, वाऱ्यांचा मंद वेग आणि वाहतूक समस्येमुळे हवा गुणवत्ता यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच खराब स्थितीत आहे.  यामुळे आरोग्य विषयक समस्या, श्वसनाचे विकारसारख्या गोष्टींना मुंबईकरांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.


मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पारच राहणार आहे. मुंबईतील हवेत पीएम 2. 5 चे प्रमाण अधिक आहे. जो मुंबईकरांसाठी अतिशय धोकादायक आहे.  डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पीएम 2.5 चे प्रमाण जास्त असल्याने फुफ्फुसाचा कर्करोग आणि अनेक प्रकारचे श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग आणि हृदयविकाराचा धोकाही उद्भवू शकतो.


मुंबईतील हवा प्रदूषितच, मुंबईतील इतर ठिकाणांवरचा एक्यूआय पुढीलप्रमाणे : 



  • कुलाबा - 290

  • नवी मुंबई - 352

  • अंधेरी - 326

  • चेंबूर - 347

  •  बीकेसी - 361

  • माझगाव - 322


हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?



  • शून्य ते 50 एक्यूआय - उत्तम 

  • 50 ते 100 एक्यूआय - समाधानकारक 

  • 101 ते 200 एक्यूआय - मध्यम 

  • 201 ते 300 एक्यूआय - खराब 

  • 301 ते 400 एक्यूआय - अतिशय खराब 

  • 401 ते 500 एक्यूआय - गंभीर 


हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांचे जमिनीवर राहात असल्याने हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र  गेल्या काही दिवसांत वाढलेल्या वाहनांच्या धुरामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे.  हवेतील धूलिकणांची वाढती पातळी ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे  मुंबईतील वातावरणात पर्टिक्युलेट मॅटर (पीएम)  2.5 आहे.  PM 2.5 हे हवेतील लहान कण आहेत जे दृश्यमानता कमी करतात. 


संबंधित बातम्या :


Cold Wave : काळजी घ्या! हवेची गुणवत्ता ढासळली, फुफ्फुस आणि श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला