एक्स्प्लोर

बदलापुरात पतीने पत्नीची हत्या करुन रचला आत्महत्येचा बनाव, आरोपी पतीला बेड्या

पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात समोर आला आहे. हत्या केल्यानंतर पत्नी आत्महत्या केल्याचा बनाव त्याने रचला होता. मात्र वैद्यकीय अहवालात पतीचं बिंग फुटलं.

कल्याण : अवघ्या दीड लाख रुपयांसाठी पतीने पत्नीची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा प्रकार बदलापुरात घडला आहे. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी काही तासातच आरोपी पतीला ठोकल्या आहेत. पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर तिने आत्महत्या केली, असा बनाव रचण्यासाठी तिचा मृतदेह दोरीने पंख्याला लटकवला. मात्र वैद्यकीय अहवालात पतीचं बिंग फुटलं आणि काही तासातच त्याला गजाआड करण्यात आलं.

अंबरनाथ एमआयडीसीत एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तुषार सांबरे याचा 2016 साली माथेरानच्या जुमापट्टीला राहणाऱ्या कांचनशी विवाह झाला होता. त्यांना अडीच वर्षांचा मुलगाही आहे. मात्र लग्न झाल्यापासून तुषार हा सातत्याने कांचनच्या माहेरी पैसे मागत होता. एक दोनदा कांचनच्या वडिलांनी त्याला पैसे दिले देखील. मात्र त्यामुळे तुषारच्या मागण्या वाढतच गेल्या.

सोमवारी 2 डिसेंबर रोजी कांचन ही पतीसोबत माहेरी आली होती. तिथून निघताना पुन्हा एकदा तुषारने कांचनच्या वडिलांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे द्यायला असमर्थता दर्शवल्यानं तुषार रागारागात पत्नीला घेऊन बदलापूरला आला. त्यानंतर पती पत्नीमध्ये भांडण झालं आणि तुषारने दोरीने गळा आवळून कांचनची हत्या केली. यानंतर आपलं कृत्य लपवण्यासाठी त्याने कांचनचा मृतदेह पंख्याला लटकवला आणि तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.

कांचनच्या कुटुंबीयांनी हा प्रकार समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र कांचनचा मृतदेह पाहून तिची हत्या झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यात कांचनने आत्महत्या केली नसून तिची हत्याच झाल्याचं निष्पन्न झालं आणि पोलिसांनी तुषारला हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवत त्याला बेड्या ठोकल्या.

तुषार याचे वडील पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. या सगळ्यानंतर तुषारच्या कुटुंबियांना सुद्धा मोठा धक्का बसला. सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे आईची हत्या करून वडील जेलमध्ये गेल्यानं त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा पोरका झाला. त्यामुळे क्षणिक रागातून टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तरुणाईने भानावर येण्याची गरज व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chhat puja: छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
Chipi Airport Sindhudurg: दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उद्या चिपी विमानतळावर नवी मुंबईहून पहिले विमान उतरणार; सिंधुदुर्गच्या विकासाला आणि पर्यटनाला नवी भरारी मिळणार
दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उद्या चिपी विमानतळावर नवी मुंबईहून पहिले विमान उतरणार; सिंधुदुर्गच्या विकासाला आणि पर्यटनाला नवी भरारी मिळणार
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडन संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget