एक्स्प्लोर
विरारमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, पती अटकेत
विरार : विरारमध्ये पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी धर्मराज यादवला पोलिसांनी अटक केली आहे.
32 वर्षीय अमरावती यादव यांची पतीने डोक्यात लाकडी फळी मारुन निर्घृण हत्या केली. विरार पूर्वमधील फुलपाडा भागातल्या राजगोविंद अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. पहाटे चार वाजता घरासमोरच डोक्यात लाकडी फळी मारुन पतीने तिचे प्राण घेतले.
चारित्र्याच्या संशयावरून धर्मराजने पत्नीची हत्या केल्याची माहिती आहे. विरार पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून धर्मराजला अटक करण्यात आली आहे. आरोपी बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
नाशिक
बातम्या
क्राईम
Advertisement