एक्स्प्लोर

यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा कराल? मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना

सार्वजनिक गणेशोत्‍सवासाठी गणेशोत्‍सव मंडळांना बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक राहील. त्‍यासाठीची ऑनलाईन परवानगी यंत्रणा कार्यान्वित करण्‍यात आली आहे.

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षीचा श्री गणेशोत्‍सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन महानगरपालिका आणि शासनस्‍तरावरुन वेळोवेळी करण्‍यात आलं आहे. यात काही अधिकच्‍या सूचनांचा समावेश करुन बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी काही सुधारित मार्गदर्शक सूचना देण्‍यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्‍सवासाठी गणेशोत्‍सव मंडळांना बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक राहील. त्‍यासाठीची ऑनलाईन परवानगी यंत्रणा कार्यान्वित करण्‍यात आली आहे, असं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेशोत्‍सव-२०२० संदर्भात सर्वसमावेशक सुधारित मार्गदर्शक सूचना सर्वसाधारण सूचना  सार्वजनिक गणेशोत्‍सवासाठी गणेशोत्‍सव मंडळांना बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक राहील. त्‍यासाठीची ऑनलाईन परवानगी यंत्रणा कार्यान्वित करण्‍यात आली आहे.  कोविड-19 या साथ रोगाचा प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्‍या परिस्थितीचा विचार करता तसेच उच्‍च न्‍यायालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि महानगरपालिकेचे या संबंधीचे धोरण लक्षात घेता, मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारावेत. यावर्षीचा गणेशोत्‍सव साध्‍या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्‍याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्‍यात भपकेबाजी नसावी.  श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरता 4 फूट व घरगुती गणपती 2 फूटांपेक्षा जास्‍त उंचीचे नसावेत.  यावर्षी शक्‍यतो पारंपरिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्‍यास त्‍याचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या घरी करावे व घरी विसर्जन करता येणे शक्‍य नसल्‍यास नजिकच्‍या कृत्रिम विसर्जनस्‍थळी विसर्जन करावे. गणेशमुर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्‍य असल्‍यास या मुर्तींचे विसर्जन माघी गणेशोत्‍सव विसर्जनाच्‍यावेळी किंवा 2021 च्‍या भाद्रपद महिन्‍यात पुढील वर्षीच्‍या गणेश विसर्जनाच्‍यावेळी करता येणे शक्‍य आहे. जेणेकरुन विसर्जनासाठी गर्दी करणे टाळून स्‍वतःचे व कुटुंबियांचे कोविड-19 या साथ रोगाच्‍या प्रादुर्भावापासून रक्षण करता येईल.  गणेशोत्‍सव 2020 साजरा करतेवेळी आरोग्‍य विषयक व सामाजिक संदेश असलेल्‍या जाहिरातींना पसंती द्यावी.  सांस्‍कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्‍य विषयक उपक्रम उदाहरणार्थ रक्‍तदान शि‍बीरे इत्‍यादी आयोजित करण्‍यास प्राधान्‍य द्यावे आणि त्‍याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्‍यू, इत्‍यादी आजार आणि त्‍यांचे प्रतिबंधात्‍मक उपाय तसेच स्‍वच्‍छता याबाबत जनजागृती करावी.  आरती, भजन, कीर्तन वा अन्‍य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच कोविड-19च्‍या अनुषंगाने लॉकडाऊन शिथिल करण्‍यासंबंधीच्‍या शासनाच्‍या प्रचलित आदेशातील (Mission Begin Again) तरतुदींचा भंग होणार नाही, याची खबरदारी घ्‍यावी, तसेच ध्‍वनि‍ प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करावे.  श्रीगणेशाच्‍या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व समाज माध्‍यमे आदींद्वारे, उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत जास्‍तीत-जास्‍त व्‍यवस्‍था करावी.  गणपती मंडपांमध्‍ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्‍क्रीनिंगची पर्याप्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. प्रत्‍यक्ष दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरि‍क अंतराचे (फिजिकल डिस्‍टन्‍सींग) तसेच स्‍वच्‍छतेचे नियम (मास्‍क, सॅनीटायझर इत्‍यादी) पाळणे बंधनकारक राहील. लॉकडाऊन संदर्भातील शासनाच्‍या (Mission Begin Again) प्रचलित आदेशामधील यासंबंधीच्‍या तरतुदी बंधनकारक असतील.  श्रींच्‍या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्‍यात येऊ नयेत. विसर्जनाच्‍या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्‍थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्‍थळी कमीत-कमी वेळेत आणि कमीत-कमी लोकांच्‍या उपस्थितीत विसर्जन पार पाडावे. लहान मुले आणि वरि‍ष्‍ठ नागरिकांनी सुरक्षेच्‍या दृष्टिने विसर्जनस्‍थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्ती एकत्रितरित्‍या विसर्जनास नेऊन गर्दी करण्‍यास परवानगी असणार नाही.  विविध गणेशोत्‍सव मंडळे, गृहनिर्माण संस्‍था, लोकप्रतिनिधी, स्‍वयंसेवी संस्‍था इत्‍यादींच्‍या मदतीने कृत्रि‍म तलावांची निर्मिती करण्‍यात यावी. तसेच कृत्रिम तलावांची निर्मिती करण्‍याबाबत मागणी आल्‍यास, काही जुजबी पडताळणी करुन त्‍यास त्‍वरित मान्‍यता द्यावी.  कोविड-19या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाने, महापालिकेने तसेच पोलीस प्रशासनाने विहित केलेल्‍या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे.  गणेशोत्‍सव विसर्जनाच्‍या तारखेस जर सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्‍ये असेल तर त्‍या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्‍सम व्‍यवस्‍था करुन मुर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक राहील.  *जर विसर्जनाच्‍या तारखेच्‍या दिवशी घरगुती गणपती स्थित असलेली इमारत / चाळ जर ‘’सिल्‍ड इमारत’’ (sealed building) मध्‍ये असेल तर त्‍यांना विसर्जनासाठी घरगुती गणेशमुर्ती बाहेर घेवून जाण्‍यास परवानगी असणार नाही. त्‍यांना सदर गणेशमुर्तीचे विसर्जन बादलीमध्‍ये किंवा ड्रममध्‍ये करणे बंधनकारक राहील.* सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांसाठी सूचना  मंडळांद्वारे स्‍थापित करण्‍यात येणा-या मुर्तीची उंची 4  फूट पेक्षा जास्‍त असू नये.  कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्‍यासाठी मंडपाचे आकारमान कमीत-कमी ठेवावे.  शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या मुखपट्टयांचा (Masks) वापर व सामाजिक अंतर (social distancing) संबंधीच्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.  मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्‍त कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत याची खबरदारी घ्‍यावी. उपस्थित सर्व व्‍यक्तिंनी मास्‍क लावणे बंधनकारक आहे व सामाजिक अंतर ठेवणे याचे काटेकोरपणे पालन होते आहे हे पाहण्‍याची जबाबदारी मंडळाच्‍या पदाधिका-यांची राहील.  मंडपाच्‍या मुख्‍य भागांचे दिवसांतून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे, तसेच कार्यकर्ते आणि इतर व्‍यक्‍ती यांना वापरासाठी Sanitizers उपलब्‍ध करुन द्यावे.  भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक, समाज माध्‍यमें इत्यादीद्वारे सुविधा उपलब्ध करुन द्यावी.  कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्‍यासाठी प्रसाद वाटणे / फूले व हार अर्पण करणे इत्‍यादी बाबींस आळा घालावा.  गणेश मंडपाच्‍या परिसरात तसेच त्‍या लगतच्‍या रस्‍त्‍यांवर फुले, हार, प्रसाद इत्‍यादी विक्रीसाठी स्‍टॉल / दुकाने इत्‍यादी लावू नयेत.  श्री गणेशाच्‍या आरतीच्‍या वेळी मंडपात दहापेक्षा जास्‍त कार्यकर्ते / भाविक उपस्थित असू नयेत. त्‍यांनी ‘मास्‍क’ आणि सामाजिक अंतरासंबंधीच्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे.  कोरोना विषाणुची गंभीर आपत्‍ती लक्षात घेता मंडप सजावट / रोषणाई / देखावे करु नयेत.  मंडळातर्फे जनजागरण / रक्‍तदान, आरोग्‍य तपासणी, लोकापयोगी आरोग्‍याभिमुख कार्यक्रम आयोजित करावेत.  शक्‍यतो व्‍यावसायिक जाहिराती करु नयेत.  ध्‍वनि‍ प्रदूषणाच्‍या अनुषंगाने विहि‍त करण्‍यात आलेल्‍या नियमांचे पालन करुन पोलीस / महापालिका प्रशासनास सहकार्य करावे.  सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन मंडपालगतच्‍या कृत्रिम तलावातच करावे.  गणेशोत्‍सवा दरम्‍यान धार्मिक, भक्‍तीपर, इ. गर्दी जमा होणा-या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे.  गणेश मूर्तीच्‍या आगमन व विसर्जनच्‍यावेळी 10 पेक्षा अधि‍क लोक असणार नाहीत व ते मास्‍क वापरतील आणि सामाजिक अंतर पाळतील याची खबरदारी घ्‍यावी व कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये.  *गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्‍या तारखेस जर सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्‍ये असेल तर त्‍या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्‍सम व्‍यवस्‍था करुन मुर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक राहील.*  *उत्‍सवप्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणुचा फैलाव होईल. तसे केल्‍यास साथरोग कायदा १८९७, आपत्ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६० कायदान्‍वये कारवाई करण्‍यात येईल.* घरगुती गणेशोत्‍सव साजरा करणाऱ्या भाविकांसाठी सूचना  घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणूकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत जास्त 5व्यक्तिंचा समूह असावा. आगमनप्रसंगी मास्क / शिल्ड स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरण्यात यावी आणि सामाजिक अंतरासंबंधीच्‍या सूचनांचे काटेकोर पालन करावे.  घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी व या मूर्तीची उंची दोन फूटापेक्षा जास्त असू नये किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टळून स्वतःचे / कुटुंबियांचे कोविड-19 साथरोगापासून संरक्षण करणे शक्य होईल.  भाविकांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळीदेखील करता येणे शक्य आहे. (त्यासाठी मूर्तीचे पावित्र्य राखणेसाठी पवित्र वस्त्रात गुंडाळून घरीच मूर्ती जतन करुन ठेवता येईल).  गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.  गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या-घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे.  विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये. विसर्जनासाठी जास्तीत जास्त 5 व्यक्तिंचा समूह असावा. त्‍यांनी देखील मास्‍क वापरावे व सामाजिक अंतराच्‍या नियमांची काटेकोर पालन करावे.  नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाण्याचे शक्यतो टाळावे.  घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती एकत्रितरित्या विसर्जनास नेण्यास मनाई राहील.  विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्क / शिल्ड स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत.  शक्यतो लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.  बृहन्मुंबई महानगरपालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.  घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.  जर विसर्जनाच्‍या तारखेच्‍या दिवशी घरगुती गणपती स्थित असलेली इमारत / चाळ जर ‘’सिल्‍ड इमारत’’ (sealed building) मध्‍ये असेल तर त्‍यांना विसर्जनासाठी घरगुती गणेशमुर्ती बाहेर घेवून जाण्‍यास परवानगी असणार नाही. त्‍यांना सदर गणेशमुर्तीचे विसर्जन बादलीमध्‍ये किंवा ड्रममध्‍ये करणे बंधनकारक राहील.  उत्सवप्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा 1897 , आपत्ती निवारण कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Embed widget