Maharashtra IT Froud case Update : शिवसेना आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोपांचे 'बाण' थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाआयटीमध्ये (Maha IT) 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला. पण मागील पाच वर्षातील आयटी विभागाला राज्य सरकारने केलेल्या आर्थिक तरतुदींवर नजर टाकली तर मात्र पंचवीस हजार कोटी रुपयांचा आकडा याबद्दल शंका उपस्थित होत आहे.


कारण राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात आयटी विभागाला फक्त 355 कोटी रुपयांचा निधी दिला आहे आणि विविध विभागाने आयटी विभागाला 724 कोटी रुपयांची कामे दिली आहेत. हे दोन्ही एकत्र केलं तरी 1100 कोटी रुपयांची काम आयटी विभागाला देण्यात आली आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. त्यात खरंच तथ्य आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.


गेल्या सरकारच्या काळात आयटी विभागासाठी करण्यात आलेली एकूण तरतूद : 355.86 कोटी रुपये


2015-16 : 6.32 कोटी


2016-17 : 14.59 कोटी


2017-18 : 155.86 कोटी


2018-19 : 84.64 कोटी


2019-20 : 74.45 कोटी
 


आयटी महामंडळातर्फे विविध विभागांची एकूण केली गेलेली कामे


2016-17, 2017-18 आणि 2018-19 या आर्थिक वर्षांत 724.18 कोटी रूपये.
 
महाआयटीच्या उत्पन्नाची व्याप्ती मोठी
असं जरी असलं तरी महाआयटी या महामंडळासाठी  ही फक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. जेवढी कामे शासकीय विभागामार्फत सोपवली आहेत तेवढीच आर्थिक घोटाळ्याची कक्षा असू शकत नाही.  महाआयटी राज्य सरकारच्या सर्व वेबसाईट्स, आयटी हार्डवेअर खरेदी यासाठी नोडल एजन्सी आहे. शिवाय आपले सरकार वगैरेसाठी सामान्य जनतेकडून तसंच महापोर्टलद्वारे बेरोजगारांकडून गोळा होणारं शुल्क याची व्याप्ती प्रचंड आहे, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 


यामुळं संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमध्ये नेमकं तथ्य काय आहे हे आता चौकशीनंतरच पुढे येऊ शकणार आहे. 


इतर संबंधित बातम्या


महाआयटीत 25 हजार कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप, 25 हजार कोटींचा घोटाळा कसा? BJP चा सवाल


Amol Kale : महाआयटी घोटाळा प्रकरण: संजय राऊतांनी आरोप केलेल्या अमोल काळेंनी म्हटलं, देश सोडून...