एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

हॉटेल, सलून व्यवसायिकांना परवानगी, जिम व्यवसायिकांना का नाही? संघटना आक्रमक

जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना प्रतिबंधित क्षेत्र वगळता व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिम व्यवसायिकांनाचं परवानगी का देण्यात आली नाही. असा संतप्त सवाल जिम व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे.

मुंबई : मिशन बिगेन अगेनच्या अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना प्रतिबंधित क्षेत्र वगळता अनेक नियम आणि अटी लागू करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. यामध्ये बाजार, कपडा व्यापारी, डोमेस्टिक एअर लाइन्स, सलून व्यवसाय यांचा समावेश आहे. हॉटेल व्यवसायिक, लॉज, गेस्ट हाऊस यांना देखील परवानगी देण्यात आली आहे. मग जिम व्यवसायिकांनाचं परवानगी का देण्यात आली नाही. असा संतप्त सवाल जिम व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. जिम व्यवसायिकांच्या म्हणण्यानुसार आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचा अवलंब करण्यास तयार आहोत. केवळ आम्हाला आमचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या. मागील जवळपास 4 महिन्यांपासून जीम बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारी हजारो कुटुंब आज आर्थिक अडचणीत आहेत. जिममधे जे जिम ट्रेनरचं काम करतात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासोबतच व्यायाम करणाऱ्यांसाठी आवश्यक असणारे प्रोटिन्सची दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे त्या व्यवसायिकांची देखील सध्या बिकट अवस्था आहे. जिम व्यवसायिकांच्या अडचणींबाबत बोलताना घाटकोपर येथील जिम व्यवसायिक संदीप भोज म्हणाले की, कोरोना व्हायरसचं महाराष्ट्रात वाढतं प्रमाण नक्कीच चिंतेची बाब आहे. परंतु सध्याची जिम व्यवसायिकांची परिस्थिती लक्षात घेतली तर ती खूपच हलाखीची सुरू असल्याचं लक्षात येईल. सध्या असे अनेक जिमचे मालक आहेत. ते भाडे तत्त्वावर जिमचा व्यवसाय करत आहेत. मागील साडेतीन ते चार महिन्यांपुर्वी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि व्यवसायिकांवर बेकरीची कुऱ्हाड कोसळली. यातील अनेक व्यवसायिक असे आहेत जे भाडे तत्वावर जिमचा व्यवसाय चालवतात. यासाठी मासिक लाखो रुपयांचं भाडं, त्यासोबतच लाईट बील आणि जिमचे साहित्य खरेदी करताना घेतलेलं कर्ज याचा मोठ्या प्रमाणात लोड व्यवसायिकांवर आहे. त्यामुळे शासनाने विशेष नियम लागू करून ज्या पद्धतीने सलून व्यवसायिक, बाजार, कपडे व्यवसायिक, हॉटेल व्यवसायिक  आणि डोमेस्टिक एअर लाइन्स चालवण्यास परवानगी दिली आहे. त्यापद्धतीने आम्हाला देखील द्यावी. आमचे व्यवसाय सुरू झाल्यास आम्ही आमच्याकडे येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष काळजी घेणार आहोत. आम्ही एकावेळी सोशल डिस्टन्स राखून जितके लोकं घेता येतील तितकेच लोक घेणार आहोत. यासोबतच आम्ही एक बॅच बाहेर पडल्यानंतर सर्व जिम सॅनिटायझ करून त्यानंतर इतर बॅचला प्रवेश देऊ. यासोबतच मास्क, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करू, सध्या अनेक जिम चालक कर्जबाजारी आहेत. अशा जिम चालकांना कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. कारण हा व्यवसाय रुळावर येण्यासाठी कमीतकमी सहा महिने जाणार आहेत. सध्या जे नागरिक जिमला येतील ते तत्काळ पैसे भरणार नाहीत. कारण त्यांना आम्हाला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. त्यामुळे बँकांनी आम्हांला कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी आणि त्यावर व्याज आकारू नये. याबाबत लवकरच आदित्य ठाकरे यांच्याशी भेट घेऊन आमच्या अडचणी मांडणार असल्याचं देखील संदीप भोज म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावनाEknath Shinde On Narendra Modi | नरेंद्र मोदी, अमित शाहा जे निर्णय घेतली तो अंतिम असेल- एकनाथ शिंदेEknath Shinde on Uddhav Thackeray | सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना कशी गरीबी कळणार- शिंदेEknath Shinde on CM Post | पायाला भिंगरी लावून मी कार्यकर्त्यांप्रमाणे काम केलं- एकनाथ शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
Embed widget