एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोनावरची होम क्वॉरंटाईन उपचार पद्धधती जीवावर बेतू शकते

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेकांना शक्य असल्यास होम क्वॉरंटाईन करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. मात्र यामध्ये योग्य खबरदारी न घेतल्या रुग्णांचा जीव देखील जाऊ शकतो.

मुंबई : तुमच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असतील किंवा आजीबातच लक्षणे नसतील तर कोरोना घरी राहुनही बरा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणंही तितकंच गरजेचं आहे. अन्यथा कोरोनाबाधितांचं रुग्णालयात न जाता होम क्वॉरंटाईन होणं जीवावर बेतू शकतं. गेल्या काही दिवसांत लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांचा अचानक झालेला मृत्यू होम क्वॉरंटाईन उपचार पद्धधतीविषयी साशंकता निर्माण करतोय.

9 जून – बीएमसीचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहत्या घरी मृत्यू झाला.

15 मे – शाहूनगर पोलीस स्टेशनमधे कार्यरत असलेले 32 वर्षीय पोलीस निरिक्षक अमोल कुलकर्णी कोरोनाबाधित होते. होम क्वॉरंटाईन असताना चेंबूरमधील राहत्या घरीच कोरोना उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

23 मे – दक्षिण मुंबईतील एका डायबिटीक पेशंटवर 15 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर घरीच उपचार सुरू होते. मात्र त्यांची ऑक्सिजन लेव्हल खालवल्यानंतर त्याच्या मुलानं दिवसभर अँम्ब्युलन्स आणि हॉस्पिटल बेडसाठी फोन आणि धावाधाव केली. मात्र उपलब्ध न झाल्यानं त्यांचा घरीच मृत्यू झाला.

या सर्वांचे मृत्यू अगदी अनपेक्षित आणि धक्कादायक होते. सौम्य लक्षणे किंवा कोणतीच लक्षणे न दाखवणाऱ्या कोरोनानं यांचा अचानक घात केला. महत्वाचं म्हणजे फार गंभीर स्थिती नाही म्हणून यांना घरीच उपचार दिले जात होते. पण, हेच घरचे उपचार महागात पडले. सुरुवातीला जेव्हा कोरोनाग्ररस्तांची संख्या कमी होती, त्यावेळी प्रत्येक कोरोनाग्रस्त रुग्णालयात दाखल व्हायचा. मात्र, नंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी ज्या घरात होम आयसोलेशन शक्य असेल, त्या रुग्णांना घरीच थांबून उपचाराचा सल्ला दिला जाऊ लागला.

मुंबईत घरीच उपचार सुरू असलेले कोरोना रूग्ण - 18 हजार 797

विवीध रूग्णालयांत दाखल असलेले रूग्ण – 7600

सध्या मुंबईत प्रत्यक्ष उपचार सुरू असलेले रूग्ण – 26 हजार 379

जर खाटांची संख्या वाढत असेल तर उपलब्ध असलेल्या खाटा रुग्णांना जलदगतीनं का मिळत नाहीत? यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी आणि उपलब्ध रिकाम्या रुग्ण खाटांचे केवळ आकडे दाखवण्यासाठी कोरोनाबाधितांना घरीच राहा, असा सल्ला दिला जातोय का? असेही प्रश्न उपस्थित होतायेत. तसंच, होम क्वॉरंटाईनचा पर्याय निवडताना रुग्णांची वेळोवेळी तपासणी आणि गरज पडल्यास तातडीचे उपचार मिळणेही तितकच गरजेचं आहे. घरीच राहुन कोरोनाला हरवा हे वाक्य आपण कोरोनापासून प्रतिबंध व्हावा म्हणून वापरु शकतो. मात्र, कोरोना झाला तरी घरीच राहा हे मात्र जीवावर बेतू शकतं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दुष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, बँक खाते चेक करा
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणं सुरु, बँक खाते तपासा
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
Nashik Mahakumbh: महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
Punjab AAP Candidate List: आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
Embed widget