एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिया खान आत्महत्या : सुरजच्या याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार
30 जानेवारी 2018 रोजी जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीवर आरोप निश्चित करण्यात आले होते.
मुंबई : जिया खान आत्महत्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सुरज पांचोलीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला. दुसऱ्या खंडपीठासमोर जाण्याचे सूरजला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी आदेश दिले आहेत.
जिया खान आत्महत्या प्रकरणी सेशन्स कोर्टात सुरु असलेला खटला जलदगतीने चालवून निकाल लावण्यात यावा, अशी सुरज पांचोलीने याचिका केली आहे. त्यावर आज सुनावणीस हायकोर्टाने नकार दिला.
सुरजवर आरोप निश्चित
30 जानेवारी 2018 रोजी जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीवर आरोप निश्चित करण्यात आले होते. कलम 306 प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सुरजवर आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र सुरजने त्यावेळी कोर्टात त्याच्यावरील आरोप फेटाळले. तसेच या संपूर्ण प्रकरणी आपण निर्दोष असल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं होतं.
जियाची आत्महत्या
3 जून 2013 रोजी जिया खानने जुहू येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी 2 जुलै रोजी जियाचा कथित प्रियकर सुरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही दिवसातच मुंबई हायकोर्टाने सुरजला जामीन मंजूर केला होता.
त्यानंतर जिया खानची आई राबिया खानने सुरज पांचोलीवर जियाची हत्या केल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केली.
2014 मध्ये मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. सीबीआयने सुरजवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं आरोपपत्र दाखल केले होते. ते आरोप 30 जानेवारी 2018 रोजी निश्चित झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement