एक्स्प्लोर

कोरोना निर्बंध कायम असलेल्या 11 जिल्ह्यांतील कनिष्ठ न्यायालयं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचे निर्देश

दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीच्या पुढील बैठकीत कोविड परिस्थिती व वकिलांच्या रेल्वे प्रवासाबाबत आढावा घेतला जाणार आहे.

मुंबई : राज्यभरातील कनिष्ठ कोर्टात कार्यरत असणाऱ्या वकिलांसाठी एक दिलासदायक बातमी आहे. मुंबईसह राज्यात सुधारलेल्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता निर्बंध लागू असलेल्या 11 जिल्ह्यातील कामकाज पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचे निर्देश देण्यात देण्यात आले आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीनं हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुंबईसह हायकोर्टाच्या नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठालाही लागू राहील. 

जुलै महिन्यात पार पडलेल्या बैठकीत कोरोनाच्या अधिक धोका असलेल्या अलिबाग-रायगड (Alibaug-Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदूर्ग (Sindhudurg), सांगली (Sangli), सातारा (Satara), सोलापूर (Solapur), कोल्हापूर (Kolhapur), पुणे (Pune), अहमदनगर (Ahmednagar), पालघर (Palghar) आणि बीड (Beed) या 11 जिल्ह्यांमधील कनिष्ट न्यायालय अर्धा दिवसच कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानं या जिल्ह्यातील न्यायालयांनाही पूर्ण दिवस काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सध्या राज्य सरकारनं केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा दिली असून वकिलांसाठी तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावेळी राज्य सरकारच्यावतीनं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी बाजू मांडताना खंडपीठाला सांगितले की, टास्क फोर्सची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्याबैठकीत दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीच्या पुढील बैठकीत कोविड परिस्थिती व वकिलांच्या रेल्वे प्रवासाबाबत आढावा घेतला जाणार आहे.

राज्यात रविवारी 4057 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

राज्यात रविवारी 4,057 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 916  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 94 हजार 767 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे. रविवारी राज्यात 67 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 50 हजार 095 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बाईक टॅक्सी चालकांना डोमिसाईल अनिवार्य, राज्य सरकारला प्रतिदिन 5 रुपये, राईडच्या 2 टक्के रक्कम द्यावी लागणार : प्रताप सरनाईक
मोठी बातमी,बाईक टॅक्सी चालकांना डोमिसाईल अनिवार्य, प्रताप सरनाईक यांची विधानसभेत घोषणा
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
Embed widget