एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला अखेर हायकोर्टाची मंजूरी, रखडलेली विकासकामं मार्गी लागणार

मॉन्सून पूर्वतयारीसाठी अनेक ठिकाणी धोकादायक झाडं तोडणे गरजेचं असतं. तसेच वृक्षतोडीच्या परवानगी अभावी मुंबईतील मेट्रो प्रकल्पासह इतर विकासकामेही खोळंबल्याने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवरील स्थगिती उठविण्यात यावी अशी मागणी पालिकेसह राज्य सरकारनंही हायकोर्टाकडे केली होती.

मुंबई : मुंबई महानगपालिका आणि राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला अखेर हायकोर्टाची मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात वृक्षतोडीच्या परवानगीसाठी रखडलेली मेट्रो प्रकल्पासह अनेक विकासकामं मार्गी लागणार आहेत. या समितीत नगरसेवक आणि जाणकार यांची सदस्यसंख्या समान असण्याची आवश्यकता नाही. सदस्य समान असायला ही काही रस्सीखेच नाही, मात्र आदेशात दिलेल्या निर्देशांची पूर्तता करणं वृक्ष प्राधिकरण आणि पालिकेला बंधनकारक राहील, जेणेकरुन त्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग होणार नाही. असं मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठानं या निकालात स्पष्ट केलं आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य निवडीला विरोध करत पर्यावरणवादी झोरु भटेना यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टानं शुक्रवारा निकाली काढली. वृक्ष प्राधिकरण समितीत वृक्ष तज्ज्ञ अनिवार्य असले तरी या समितीत नगरसेवक आणि तज्ञांची संख्या समान असणे आवश्यक नाही. याचिकाकर्त्यांकडून चुकीचा युक्तिवाद करण्यात येत असून कोर्टाची केवळ दिशाभूल केली जात आहे. असा युक्तिवाद राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टात केला होता. या समितीत १४ नगरसेवकांचा भरणा असल्याची माहिती सादर करत यात तज्ज्ञांचा अभाव असल्याने त्यावर स्थगिती घालण्यात यावी. अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते झोरू भटेना यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याची दखल घेत  24 ऑक्टोबर 2018 रोजी हायकोर्टानं या समतिच्या कामकाजावर स्थगिती घातली होती. मुंबईत कुठलंही झाड तोडण्यासाठी या समितीची परवानगी अनिवार्य असते मात्र जोपर्यंत ही समिती नियमानुसार कार्यान्वित होत नाही तोपर्यंत आणीबाणीच्या काळातील अत्यावश्यक वृक्ष तोडीबाबत पालिका आयुक्तांनी आपल्या विशेषाधिकारात निर्णय घ्यावेत असे आदेश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठानं यापूर्वी आपल्या आदेशांत स्पष्ट केलं होतं. मॉन्सून पूर्वतयारीसाठी अनेक ठिकाणी धोकादायक झाडं तोडणे गरजेचं असतं. तसेच वृक्षतोडीच्या परवानगी अभावी मुंबईतील मेट्रो प्रकल्पासह इतर विकासकामेही खोळंबल्याने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवरील स्थगिती उठविण्यात यावी अशी मागणी पालिकेसह राज्य सरकारनंही हायकोर्टाकडे केली होती. सध्याच्या 14 सदस्यिय वृक्ष प्राधिकरण समितीत पाच वनस्पती शास्त्रातील जाणकारांचा समावेश असून उर्वरीत सदस्य संख्येत नगरसेवकांचा समावेश आहे. तर पालिका आयुक्त हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Mumbai : अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget