एक्स्प्लोर

वांद्रे-कुर्ला संकुलातील आरक्षित भूखंड गैरव्यवहारप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना हायकोर्टाचा दिलासा

मदान ज्यावेळेस मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त होते, त्यावेळी त्यांनी इंडियन फर्म कंबाईन प्रा. लि. चे संचालक रणबीर मकेर आणि मनीष मकेर यांना फायदा व्हावा यासाठी सागरी किनारा नियमांचे उल्लंघन केले, असा आरोप करत फौजदारी तक्रार विशेष न्यायालयात करण्यात आली होती.

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव यू. पी. एस मदान यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील ड्राईव्ह इन थिएटरसाठी आरक्षित भूखंडामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाची चौकशी करण्याच्या विशेष न्यायालयाचा निर्णय सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मदानयांच्याविरोधात तपास करण्यासाठी आवश्‍यक असलेली परवानगी तपास अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही, असा दावा मदान यांच्यावतीने यावेळी करण्यात आला. फौजदारी दंड संहितेच्या कलम 197 नुसार शासकीय कर्मचाऱ्याची चौकशी करताना सरकारकडून परवानगी आवश्‍यक असते. मात्र या नियमाचे रितसर पालन झाले नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. मदान ज्यावेळेस मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त होते, त्यावेळी त्यांनी इंडियन फर्म कंबाईन प्रा. लि. चे संचालक रणबीर मकेर आणि मनीष मकेर यांना फायदा व्हावा यासाठी सागरी किनारा नियमांचे उल्लंघन केले, असा आरोप करत फौजदारी तक्रार विशेष न्यायालयात करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते प्रताप तेली यांनी केलेल्या या तक्रारीवरुन सत्र न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीचे आदेश ऑक्‍टोबर 2018 मध्ये दिले होते. याविरोधात मदान यांनी हायकोर्टात याचिका केली होती. सोमवारी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठानं ही याचिका मंजूर केली करत विशेष न्यायालयाचे चौकशीचे आदेश रद्द केले आहेत. वांद्रे पूर्व येथील सुमारे 20 एकर प्लॉट ड्राईव्ह इन सिनेमागृहासाठी राखीव होता. नियमानुसार संबंधित आरक्षण बदलता येत नाही. मात्र असे असतानाही याठिकाणी जादा एफएसआयचा वापर करुन बेकायदेशीरपणे शॉपिंग मॉल आणि अन्य बांधकाम नियमांचे उल्लंघन करुन बांधण्यात आले, असा आरोप करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Maharashtra Weather Updates: पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
Embed widget