मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या स्वागत मिरवणुकीसाठी मुंबई भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळापासून बीकेसीपर्यंत हजारो बाईक्सची रॅली काढण्यात आली. यामुळे भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन झालं, मात्र याचा फटका मुंबईकरांना बसला.
या बाईक रॅलीमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. मुंबईकर सुमारे चार तास वाहतूक खोळंब्यात अडकले होते. तर शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांच्या 6.45 वाजताचं दिल्लीचं फ्लाईट मिस झालं.
राजुल पटेल यांच्या मुलीचं दिल्लीत लग्न आहे आणि संध्याकाळी त्यांना हळदीच्या कार्यक्रमाला पोहोचायचं होतं. मात्र वाहतूक खोळंब्यामुळे त्यांचं फ्लाईट सुटलं आणि त्यांना 9 वाजता सूर्य फ्लाईटने दिल्लीला जावं लागलं. राजुल पटेल अशा एकट्या नसून अनेकांना या वाहतूक खोळंब्याचा फटका बसला.
भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर आज भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाचं पहिल्यांदाच आयोजन होत असल्यामुळे याकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष दिल्याचं मागील 2-3 दिवसांपासून पाहायला मिळालं.
अमित शाहांच्या स्वागत रॅलीचा शिवसेना नगरसेविकेसह मुंबईकरांनाही फटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Apr 2018 07:24 AM (IST)
अमित शाह यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळापासून बीकेसीपर्यंत हजारो बाईक्सची रॅली काढण्यात आली. यामुळे भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन झालं, मात्र याचा फटका मुंबईकरांना बसला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -