एक्स्प्लोर
वर्सोवा पूल बंद केल्यानं ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी
ठाणे: ठाणे, घोडबंदर आणि भिवंडी शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीचा बराच खोळंबा झाला आहे.
मुंबई- अहमदाबादला जोडणारा वर्सोवा पूल बंद असल्यानं मोठ्या गाड्यांची वाहतूक ही विविध मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे काल रात्रीपासून ठाणे, भिवंडी, शिळफाटा, तसंच घोडबंदरमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.
दोन आठवड्यांसाठी वर्सोवा पूल बंद करण्यात आल्यानं जवळपास वाहनांच्या 20 किमीपर्यंत लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. अनेक अवजड वाहनं भिवंडीमार्गे वळविण्यात आल्यानं येथील अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement