अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड रूग्णासाठी
- अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड रूग्णासाठी सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशीही ताप नसल्यास त्याला दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्यात यावा. यासाठी कोवीड चाचणी करण्याची गरज नाही
- डिस्चार्जनंतर या संबंधित रूग्णास 7 दिवस होम क्वॉरंटाईन गरजेचे राहिल.
- डिस्चार्ज देण्यापूर्वी ऑक्सीजनचे प्रमाण 95 टक्के पेक्षा कमी आढळल्यास तर त्या डेडिकेटेड कोविड सेंटर मध्ये दाखल करावे.
मध्यम लक्षणे असणारे रुग्ण
तीन दिवसांत रुग्णांमधील ताप कमी झाला असेल तर आणि पुढील 4 दिवस ऑक्सिजनचे प्रमाण 95 टक्के पेक्षा जास्त असेल अशांना लक्षणे सुरु झाल्यापासून 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात यावा. या रुग्णांना डिस्चार्ज करतांना पुन्हा कोविड चाचणीची गरज नाही. तसंच डिस्चार्जनंतर सात दिवस होम क्वॉरंटाईन करावे.
गंभीर रुग्णांसाठी
रुग्णांमध्ये लक्षणे आढळून न येता त्यांच्या कोविड चाचणीचा रिपोर्टही निगेटिव्ह येणं आवश्यक आहे. या रुग्णांचा एक नमुना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. ही चाचणी कोविड लक्षणे नाहिशी झाल्यानंतरच करण्यात येईल. या रुग्णांना लक्षणे आढळल्यापासून डिस्चार्ज करेपर्यंतचा कालावधी किमान 10 दिवस असावा.