एक्स्प्लोर

हेडफोनवाला सत्संग, प्रदूषण टाळण्यासाठी 10 हजार हेडफोन्स

उल्हासनगरच्या गोल मैदानात सप्टेंबर महिन्यापासून 40 दिवस अमृत वेली परिवाराचा हा सत्संग चालतो.

मुंबई: उल्हासनगरात एक अनोखा सत्संग सुरु आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी या सत्संगात भाविकांना चक्क हेडफोन वाटण्यात आले आहेत. सुसज्ज मंडप.. जवळपास 5 हजार भाविकांची गर्दी, पण सगळे चिडीचूप आणि तल्लीन. भल्यापहाटे इथं सत्संग सुरु आहे असं कुणी सांगितलं, तर त्यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. कारण हा सत्संग सुरू आहे हेडफोन्सवर! उल्हासनगरच्या गोल मैदानात सप्टेंबर महिन्यापासून 40 दिवस अमृत वेली परिवाराचा हा सत्संग चालतो. मागील अनेक वर्षांपासून चालणाऱ्या या सत्संगाची वेळ असते पहाटे पावणेचार ते पाच! शिवाय मैदानाच्या चारही बाजूंना रहिवासी भाग. त्यामुळं इतक्या पहाटे स्पीकर्स लावून सत्संग केला, तर परिसरातल्या लोकांची झोपमोड होण्याची भिती असते. शिवाय इतक्या पहाटे सत्संग केल्यानंतर त्यातून होणारं ध्वनीप्रदूषण वेगळंच. हेडफोनवाला सत्संग, प्रदूषण टाळण्यासाठी 10 हजार हेडफोन्स त्यामुळं हे सारं टाळण्यासाठी यंदाच्या वर्षीपासून या सत्संगात खास हेडफोन्स तयार करण्यात आले आहेत. समोरच्या भव्य स्टेजवर शीख समुदायाचे संत भाईसाहब भजन आणि प्रवचन करतात, त्यांना वाद्यांचीही साथ असते. मात्र त्यांचा आवाज स्पीकरकडे न जाता तो जातो थेट भाविकांच्या हेडफोनमध्ये, आणि भाविकही कानात हेडफोन घालून सत्संगात तल्लीन होऊन साथ देतात. या आगळ्यावेगळ्या सत्संगासाठी याठिकाणी वायफाय यंत्रणा उभारण्यात आली असून, त्यावर चालणारे 10 हजार विशेष हेडफोन्स तयार करुन घेण्यात आले आहेत. इथं आलेले सर्व भाविक हे विशेष हेडफोन घालून सत्संगात सहभागी होतात. बरं फक्त मंडपातच बसलेल्या भाविकांना नाही, तर जगभरात असलेल्या अमृत वेली परिवाराच्या जवळपास 25 लाख अनुयायी आणि भाविकांना हा सत्संग थेट पाहता येण्याचीही व्यवस्था केली जाते. हे हेडफोन्स घालून सत्संगात सहभागी झाल्यानंतर आधीपेक्षाही अधिक आनंददायी अनुभव येत असल्याचं भाविक सांगतात. शिवाय या निर्णयाचं स्वागत करतानाच न्यायालयाचा सन्मान राखल्याचीही भावना भाविक व्यक्त करतात. हेडफोनवाला सत्संग, प्रदूषण टाळण्यासाठी 10 हजार हेडफोन्स हा आगळावेगळा सत्संग येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री गुरु गोविंद सिंह यांचा जन्मसोहळा याठिकाणी होणार असून या सोहळ्याला जवळपास 1 लाख भाविक हजेरी लावतील, असं अंदाज आहे. मात्र इतकी प्रचंड गर्दी होऊनही इथं कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. त्यामुळं अमृत्वेली परिवाराची शिस्त आणि त्यांच्याकडून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी लढवण्यात आलेली ही अनोखी शक्कल, यांचं कौतुकच करावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
Neeta Ambani Talks In Marathi At Ajay Atul Live Show: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO
अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO
Mumbai AC Local: गर्दीच्या वेळी लोकलमधील एसी पडला बंद , 15 मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध पडले, नेमकं काय घडलं?
गर्दीच्या वेळी लोकलमधील एसी पडला बंद , 15 मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध पडले, नेमकं काय घडलं?
Vinayak Raut : सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं
सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं

व्हिडीओ

Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
Jejuri Varkari Accident: जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget