Railway Rules : गेल्या काही महिन्यांत अनेक मोठे रेल्वे अपघात (Railway Accident) झाले आहेत. कधी रुळावरुन ट्रेन घसरल्यामुळे, तर कधी मुसळधार पावसामुळे एवढंच नाहीतर दाट धुक्यामुळे अनेक मोठमोठे रेल्वे अपघात झाल्याचं आपण पाहिलंय. मुंबई लोकल (Mumbai Local) म्हणजे, मुंबईकरांची लाईफलाईन. मुंबई (Mumbai Train) लोकलमधून (Local Updates) पडून किंवा ट्रेन खाली येऊन दररोज म्हटलं अपघात होतात. अनेक प्रवाशांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पण, अशा परिस्थितीत रेल्वेकडून अपघातग्रस्तांना किंवा अपघातात मृत्यू झालेल्यांना नुकसानभरपाई मिळते का? यासंदर्भात रेल्वेचा नियम आणि कायदा काय सांगतो? जाणून घेऊयात... 


देशातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांबाबत जाणून घेऊयात... 


2024 वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच, जानेवारी 2024 मध्येच, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसची कर्नाटकजवळ मालगाडीला टक्कर झाली होती. या अपघातात सुमारे 50 जण जखमी झाले होते. तर 15 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर बालासोर रेल्वे अपघात झाला. 2 जून 2023 रोजी ओदिशातील बालासोर जिल्ह्यात एक मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली.


बालासोर अपघातात तब्बल 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर एक हजारहून अधिक लोक जखमी झाले होते. 2022 मध्ये पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्याजवळ मुंबई-हावडा लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरुन खाळी घसरले होते. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले होते. याशिवाय देशात अनेक मोठे रेल्वे अपघात झाले आहेत, ज्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. 


तिकीटाशिवाय प्रवास आणि नुकसान भरपाईचा नियम नेमका काय सांगतो? 


रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनल


अनेकदा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या भरपाईमध्ये काही अडचण आल्यावर येथे सुनावणी घेतली जाते. 2014 मध्ये दीपक ठाकरे नावाच्या व्यक्तीचा चालत्या ट्रेनमधून घसरून पडून मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रेल्वेकडे भरपाईची मागणी केली असता, रेल्वे क्लेम्स ट्रिब्यूनल (RCT) मृत दीपक ठाकरे यांच्याकडे प्रवासाचे तिकीट नसल्याचं सांगत नुकसान भरपाई देण्यास नकार दिला.


कुटुंबीयांनी याला विरोध केल्यानं हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच पोहोचलं. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानंही या प्रकरणी आरसीटीचा निर्णय कायम ठेवला. तसेच, तिकीट नसलेल्या प्रवाशांना रेल्वेकडून नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याचं उच्च न्यायालयानंही स्पष्ट केलं. म्हणजेच, रेल्वे अपघातादरम्यान जर तुमच्याकडे तिकीट नसेल, तर तुम्ही रेल्वेनं दिलेल्या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार नाही, हे स्पष्ट आहे.