एक्स्प्लोर

..तर तुमचे अधिकार काढून घेऊ, हायकोर्टाने एएआयला फटकारलं

या घटनेत वैमानिकांसह इतरांचाही जीव गेला. यासंदर्भातील याचिका हायकोर्टाने निकाली काढली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची गंभीर दखल घेत संबंधित एअरपोर्ट प्रशासनाने योग्य ते निर्णय घ्यावेत असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

मुंबई : घाटकोपर इथे गुरुवारी घडलेल्या विमान दुर्घटनेचे घटनेचे पडसाद शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयातही पाहायला मिळाले. 'प्रत्येक प्रकरण हायकोर्टात का आणता? तुम्हाला तुमच्या अधिकारांमध्ये लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घेता येत नसतील तर तसं सांगा, आम्ही तुमचे अधिकारच काढून घेतो', अशा स्पष्ट शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एएआय आणि डीजीसीएचे कान टोचले आहेत. या घटनेत वैमानिकांसह इतरांचाही जीव गेला. यासंदर्भातील याचिका हायकोर्टाने निकाली काढली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची गंभीर दखल घेत संबंधित एअरपोर्ट प्रशासनाने योग्य ते निर्णय घ्यावेत असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. जुहू एअरपोर्टच्या धावपट्टीशी निगडीत फनेल एरियातून जाणाऱ्या मेट्रो 2बी करता निर्धारित उंचीत 11 सेंटीमीटर्सची सूट द्यावी, यासाठी एमएमआरडीएने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या भागात कोणत्याही बांधकामाची उंची ही 16.65 मीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. मात्र एका ठिकाणी मेट्रोच्या ओव्हरहेड वायरची उंची 16.76 मीटर इतकी होत आहे. मात्र मुंबईत मेट्रो प्रकल्पाचं महत्त्व लक्षात घेऊन एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने या कामासाठी एनओसी याआधीच दिली आहे. मात्र ही एनओसी देताना हायकोर्टात एअर पोर्ट शेजारच्या उंच इमारतींचं प्रकरण प्रलंबित असल्याने या कामासाठीही हायकोर्टाची परवानगी घ्यावी असं एएआयने म्हटलं होतं. त्यामुळे हायकोर्टात आल्याचं एमएमआरडीएने स्पष्ट केलं. यावर एएआयने त्यांच्या अधिकारातच हे निर्णय घ्यावेत, हायकोर्टाला यात भागीदार करु नये, असे निर्देश देत हायकोर्टाने दोन आठवड्यांसाठी ही सुनावणी तहकूब केली आहे. जुहूचं विमानतळ हे प्रामुख्याने ओएनजीसीच्या इंजिनिअर्स, शास्त्रज्ञांकडून वापरलं जातं. कालच्या घटनेतही काही लोकांचा जीव गेला. त्यामुळे जुहूचं एअरपोर्ट हे चॉपर्स आणि चार्टर्ड विमानांसाठी असलं तरी त्याची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असल्याचं हायकोर्टाने यावेळी नमूद केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut : गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
Mumbai Marathi : मराठीत बोला, प्रवाशाची टीसीकडे मागणी; RPF स्थानकात प्रवाशाला तासभर बंदिस्त ठेवलं, रेल्वे प्रशासनाची मराठी विरोधी भूमिका
मराठीत बोला, प्रवाशाची टीसीकडे मागणी; RPF स्थानकात प्रवाशाला तासभर बंदिस्त ठेवलं, रेल्वे प्रशासनाची मराठी विरोधी भूमिका
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget