एक्स्प्लोर

मंदिरातील पुजाऱ्यांच्या विश्वस्त पदावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा, धर्मादाय आयुक्तांचा जुना निर्णय हायकोर्टाकडून रद्द

मंदिरातील पुजाऱ्यांना मंदिराच्या विश्‍वस्त पदापासून वंचित ठेवण्याचा धर्मादाय आयुक्तांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी रद्द केला आहे. त्यामुळे पुजाऱ्यांना विश्‍वस्त पदावर नियुक्ती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

मुंबई : मंदिरातील पुजाऱ्यांना मंदिराच्या विश्‍वस्त पदापासून वंचित ठेवण्याचा धर्मादाय आयुक्तांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी रद्द केला आहे. त्यामुळे पुजाऱ्यांना विश्‍वस्त पदावर नियुक्ती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ज्या व्यक्तींचे संस्थेशी हितसंबंध असतात त्या व्यक्तींना तिथल्या विश्‍वस्त पदावर नियुक्त करु नये, असा कायदा आहे. मात्र पुजाऱ्यांचे मंदिरामध्ये व्यक्तिगत हितसंबंध नसतात, त्यामुळे त्यांची विश्‍वस्त म्हणून नियुक्ती होऊ शकते. असं मत यावेळी न्यायालयाने व्यक्त केलं. धर्मादाय आयुक्तांनी 13 नोव्हेंबर 2017 रोजी याबाबत एक परिपत्रक जारी केले होते. यात मंदिरातील पुजारी हे देवस्थानाचे लाभार्थी असल्यामुळे ते तिथे विश्‍वस्त होऊ शकत नाहीत. तसेच त्यांना मंदिराच्या कामाबाबतही वेतन मिळते, त्यामुळे त्यांना विश्‍वस्त म्हणून नियुक्त करता येणार नाही, असे म्हटले होते. या निर्णयाला राज्यातील सहा देवस्थांनाच्या पुजाऱ्यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था कायद्याला अनुसरून नसल्याने धर्मादाय आयुक्तांचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्र्यंबेकश्‍वर मंदिराबाबत दिलेल्या निकालाचा दाखलाही यावेळी देण्यात आला. मात्र मंदिराचे व्यवस्थापन आणि संस्थेच्या एकंदरीत हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला. अखेरीस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने धर्मादाय आयुक्तांचा हा निर्णय रद्द केला.

महत्त्वाच्या बातम्या

Goregaon Bus Fire : मुंबईत थरार! गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली बेस्ट बसला भीषण आग; स्टेशनवर धुराचे लोट, प्रवाशांची पळापळ
गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली बेस्ट बसला भीषण आग; स्टेशनवर धुराचे लोट, प्रवाशांची पळापळ
Mumbai Crime News: कौटुंबिक वादाचा भयावह शेवट, आधी 19 वर्षीय पत्नीला संपवलं, नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; मुंबई हादरली!
कौटुंबिक वादाचा भयावह शेवट, आधी 19 वर्षीय पत्नीला संपवलं, नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; मुंबई हादरली!
Ganeshotsav DJ News : उत्सवांचा थाट, पण निर्बंधांमुळे वाद! नागपूर, सोलापूरपासून ते सांगली साताऱ्यापर्यंत राज्यात कुठे-कुठे डीजे बंदीचा आदेश? वाचा सर्व अपडेट्स
उत्सवांचा थाट, पण निर्बंधांमुळे वाद! नागपूर, सोलापूरपासून ते सांगली साताऱ्यापर्यंत राज्यात कुठे-कुठे डीजे बंदीचा आदेश? वाचा सर्व अपडेट्स
Mumbai Plastic Ban: 50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करा; मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करा; मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Nagpur DJ BAN : महाराष्ट्राच्या उपराजधानीत डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
Satej Patil: महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
Sanjay Raut: 'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
Vidyanand Bapat : विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांच्या पुस्तकांचा प्रभाव? विद्यानंद बापट यांनी कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात नास्तिक होण्याचा प्रवास मांडला...
विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांचा प्रभाव? नास्तिक होण्याचा प्रवास सांगत म्हणाले...
Embed widget