एक्स्प्लोर

पोद्दार मिलमधील कर्मचारी महिलेला सेवाकाळ वाढवून न देण्याचा एनटीसीचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द

सरकारी पदावर नाव नोंदवणे काम करत असलेल्या व्यक्तीला स्त्री-पुरुष असा मतभेद न करता त्याच्या कार्यक्षमतेनुसार निवृत्तीनंतरचा सेवाकाळ वाढवून द्यावा, असे महत्त्वपूर्ण निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले आहे.

मुंबई : सरकारी पदावर नाव नोंदवणे काम करत असलेल्या व्यक्तीला स्त्री-पुरुष असा मतभेद न करता त्याच्या कार्यक्षमतेनुसार निवृत्तीनंतरचा सेवाकाळ वाढवून द्यावा, असे महत्त्वपूर्ण निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले आहे. तसेच सदर प्रकरणात याचिकाकर्त्या महिलेची बाजू ग्राह्य धरत तिला निवृत्तीनंतरचा कार्यकाळ वाढवून देण्याचे आदेशही एनटीसीला दिले आहेत. मागील वर्षी जुलै महिन्यात मुंबईतील नॅशनल टेक्साईल कॉर्पोरेशनच्या (एनटीसी) पोद्दार मिलमध्ये लिपीक पदावर काम करणाऱ्या महिलेला 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून मिलकडून निवृत्तीची नोटीस पाठवण्यात आली. परंतु, आपल्याला निवृत्तीनंतरचा कार्यकाळ वाढवून द्यावा अशी विनंती तिने मिल व्यवस्थापनाकडे केली होती. तिची ही मागणी व्यवस्थापनाने नाकारल्यानंतर तिने इतर पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्यालाही तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून मिळावा, अशी मागणी मिल व्यवस्थापनाकडे केली. त्याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे अखेर त्या महिलेने हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. आपल्यावर अन्याय होत असून इथे स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. तेव्हा, निवृत्तीनंतर कार्यकाळ वाढवून देताना कर्मचाऱ्यांची शारिरीक क्षमता पाहूनच त्यांना कार्याकाळ वाढवून दिला जातो. सदर महिलेचा याच धर्तीवर कार्यकाळ वाढवला नसल्याचं मिल व्यवस्थापनाने आपली बाजू मांडताना हायकोर्टाला सांगितले. त्यावर नाराजी व्यक्त करत मुंबई कामगार कायद्यातंर्गत कुठेही अशी तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच पुरूषांना कार्यकाळ वाढवून मिळतो मात्र महिलांना नाही, हा भेदभाव इथे दिसून येत असल्याचे स्पष्ट करत सदर महिलेलाही कार्यकाळ वाढवून देण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget