मुंबई : जीन्स घालण्यासाठी विरोध केल्यामुळे पत्नीने पतीवर कौटुंबिक छळाची तक्रार केली. या पतीला मुंबई हायकोर्टाने दिलासा देत 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीवर भा.दं.वि 498 A या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक आणि कायदेशीररित्या छळ यामध्ये फरक आहे. वैवाहिक जीवनातील प्रत्येक वाद हा छळ नसतो. कठोर आणि हानिकारक कृत्यांवर कारवाई झालीच पाहिजे, ज्यामुळे विवाहितेच्या जीवाला धोका निर्माण होईल किंवा आत्महत्येला प्रवृत्त केलं जाईल.
विरारमध्ये राहणाऱ्या या दाम्पत्याचा 2016 साली विवाह झाला होता. फेब्रुवारी 2017 साली पत्नीने पतीकडून छळ होत असल्याची तक्रार केली. लग्नानंतर पतीने जीन्स घालण्यावर बंदी घातली. सातच्या आत घरात यायचं असा नियम बनवला. खाण्यावरही बंधनं आणली, अशी तक्रार पत्नीने केली होती.
पत्नीला जीन्स घालायला विरोध केल्याने पतीवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Oct 2017 09:00 AM (IST)
पतीने जीन्स घालण्यासाठी विरोध केल्याने पत्नीने कौटुंबिक छळाची तक्रार केली. पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -