मुंबई: सकाळी-सकाळीच नवी मुंबईकरांना लोकलने ‘बॅड न्यूज’ दिली. पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र थोड्यावेळापूर्वी ही वाहतूक सुरु झाली आहे.


पण कामाला जाण्याच्या वेळीच लोकलने धोका दिल्याने प्रवासी संतापले आहेत. ठिकठिकाणी प्रत्येक स्टेशनवर मोठी गर्दी वाढत आहे.

काही वेळापूर्वीच रेल्वे रुळाला तडे गेले, त्यामुळे लोकल वाहतूक रखडली होती. त्यानंतर तातडीने दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं.

वाहतूक ठप्प झाल्याने सकाळच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.  ऐन कामाला जायच्या वेळी ही घटना घडल्याने चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय.