Maharashtra News: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महाराष्ट्राचे (Maharashtra News) माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं (High Court Of Bombay) नुकतीच फेटाळून लावली आहे. माजी राज्यपाल कोश्यारी यांचा हेतू समाजाचं प्रबोधन (Social Awareness) करण्याचाच होता, कोणत्याही महान व्यक्तीचा अनादर करण्याचा नव्हता असं निरीक्षण न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil b. Shukre) आणि न्यायमूर्ती अभय वाघवासे (Abhay Waghwase) यांच्या खंडपीठानं या संदर्भातील याचिका फेटाळताना आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
राज्यपालांची (Governor of Maharashtra) वक्तव्य ही इतिहासाच्या विश्लेषणात्मक आहेत. ही वक्तव्य राज्यपालांचा सामाजिक दृष्टीकोन दाखवतात. श्रोत्यांनीही समाजाभीमूख दृष्टीकोन आत्मसात करत तो आचरणातही आणावा हाच त्या वक्तव्यांमागचा उद्देश होता. त्यामुळे ही वक्तव्य प्रथमदर्शनी कोणत्याही महापुरुषाचा अवमान करणारी नाहीत. म्हणूनच ही फौजदारी कायद्यानुसार, दखल घेण्यास पात्र ठरत नाहीत, असंही निरीक्षण हायकोर्टानं (High Court) आपल्या आदेशात नोंदवत ही याचिका फेटाळून लावली.
याचिका नेमकी काय होती?
माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले (Jyotirao Phule) आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाईची मागणी करत रिट याचिका दाखल करण्यात आली होती. अनुसूचित जाती, जनजाती प्रतिबंधक अधिनियम 2015 (सुधारित) कलम 3 (1)(5) अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यपाल आणि भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी (BJP MLA Sudhanshu Trivedi) यांनी केलेल्या विवादीत वक्तव्यांमुळे अनुसूचित जाती सोबतच सर्वसामान्य लोकांच्याही भावना दुखावल्या गेल्याचा आरोप याचिकर्ते रामा कटारनावरे यांनी आपल्या याचिकेतून केला होता. या याचिकेद्वारे त्यांनी कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :