एक्स्प्लोर

'सिंबा'तील 'त्या' गाण्याच्या प्रदर्शन स्थगितीस हायकोर्टाचा नकार

येत्या काळात या प्रकरणाचा निकाल याचिकाकर्त्यांच्या बाजून लागल्यास नुकसान भरपाई मागण्याचा त्यांचा हक्क कोर्टानं अबाधित ठेवला आहे.

मुंबई : 'सिंबा' सिनेमातील 'तेरे बिन नही लगता...' या गाण्याच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. उच्च न्यायलायाच्या या निर्णयामुळे रोहित शेट्टी आणि धर्मा प्रॉडक्शन यांना दिलासा मिळाला आहे.

"याचिकाकर्त्यांनी न्यायालयात येण्यास बराच उशीर केला आहे. सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या काही तासांवर आल्यानं या सिनेमाच्या प्रिंट्स जगभरात प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. त्यामुळे आता पुन्हा सिनेमा एडिट करून त्यातून गाणं काढणं शक्य नाही", असं सुट्टीकालीन न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी स्पष्ट केलं. याचिकाकर्त्यांची 'तेरे बिन नही लगता...' हे गाणं प्रदर्शित न करु देण्याची मागणी फेटाळून लावली.

मात्र येत्या काळात या प्रकरणाचा निकाल याचिकाकर्त्यांच्या बाजून लागल्यास नुकसान भरपाई मागण्याचा त्यांचा हक्क कोर्टानं अबाधित ठेवला आहे.

शुक्रवारी 28 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित 'सिंबा' या सिनेमात नुसरत फतेह अली खान यांचं प्रसिद्ध गाण 'तेरे बिन नही लगता...' याचं रिमिक्स वापरण्यात आलं आहे. मात्र या गाण्याचे मूळ कवी ख्वाजा परवेझ आणि नुसरत फतेह अली खान यांच्या वारसांनी त्यांच्या गाण्याचे मालकी हक्क दिलेल्या म्युझिक कंपन्यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आमच्याशी कोणताही करार न करता हे गाणं वापरण्यात आल्याचा दावा करत वोमॅड म्युझिक लिमिटेड आणि हरियानी म्युझिक यांनी सिंबाच्या निर्मात्यांविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती.

यावेळी सिंबाच्या निर्मात्यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी स्पष्ट केलं की, साल 1994 मध्ये 'सॉनिक' या कराची, पाकिस्तानस्थित कंपनीसोबत नुसरत फतेह अली खान यांचा त्यांनी गायलेल्या गाण्यासंबंधातील करार झालेला आहे. त्यामुळे याचिकाकर्ते या गाण्यावर आपला दावा सांगू शकत नाहीत.

मात्र याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार गाण्याचे बोल हे मूळ कवीच्या नावावर आहेत, ते गाणारा गायक त्यावर आपला हक्क कसा सांगू शकतो. मूळ कवी ख्वाजा परवेझ यांचा साल 1991 मध्ये या म्युझिक कंपनीसोबत करार केलेला आहे. त्यामुळे गाण्यातील मूळ शब्दांवर त्यांचाच मालकी हक्क आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार
अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Navi Mumbai Crime News: नवऱ्याला संपवलं, बॉडीचे तीन भाग केले, प्रियकराच्या ऑटो रिक्षातून गवळीदेवच्या डोंगरावर टाकले, ऐरोलीतील केसची स्टार्ट टू एंड स्टोरी
नवऱ्याला संपवलं, बॉडीचे तीन भाग केले, प्रियकराच्या ऑटो रिक्षातून गवळीदेवच्या डोंगरावर टाकले, ऐरोलीतील केसची स्टार्ट टू एंड स्टोरी

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
Embed widget