एक्स्प्लोर

नगरसेवकपद रद्द झालेल्या बीएमसीच्या प्रभागात पोटनिवडणुकांना स्थगिती

महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या चार उमेदवारांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली

मुंबई : मुंबई महापालिकेच्या पश्‍चिम उपनगरांमधील रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. चार नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द झाल्याने दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांनी नगरसेवकपदावर हक्क सांगत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या चार उमेदवारांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्रमांक 76, 32, 81 आणि 28 मध्ये पोटनिवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. यासंबंधी एक अधिसूचनाही नुकतीच जारी करण्यात आली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार नितीन सलाग्रे (काँग्रेस), गीता भंडारी, संदीप नाईक आणि शंकर हुंडारे (सर्व शिवसेना) यांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. बीएमसीतील चौघा नगरसेवकांचं पद धोक्यात, दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना संधी निवडणूक आयोगाने सध्या केवळ मतदारयादी अद्ययावत करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या प्रभागात अद्याप निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत. मात्र मतदारयाद्यांची तपासणी झाल्यावर निवडणुका घोषित होण्याची शक्‍यता आहे, असं निवडणूक आयोगाच्या वतीने कोर्टात स्पष्ट करण्यात आलं. या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या प्रकरणातील काही याचिका अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे आयोग अशाप्रकारे निवडणूक जाहीर होऊ शकत नाही. अशाप्रकारे आकस्मिकपणे निवडणुका जाहीर केल्यास याचिकादारांच्या कोर्टातील प्रलंबित दाव्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असंही याचिकाकर्त्यांच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आलं. हायकोर्टानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर आयोगाला 12 जूनपर्यंत निवडणुका जाहीर करण्यास मनाई केली करत जूनच्या पहिल्या आठवड्यात यावर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Kishori Pednekar On Kangana Ranaut: घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
BMC Mumbai: मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
Rahul Gandhi: राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
Embed widget