एक्स्प्लोर

'आजोबांनी लावलेली झाडं तोडू नका', कुटुंबाच्या भावनिक आवाहनाला हायकोर्टाचा दिलासा

मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या विशेष अधिकारात दिलेल्या या परवानगीला हायकोर्टानं तूर्तास स्थगिती दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे यावर गुरुवारी सुनावणी झाली.

मुंबई : 'आमच्या आजोबांनी 80 वर्षांपूर्वी लावलेली झाडं तोडू नका, या झाडांसोबत आमच्या भावना जोडलेल्या आहेत', अशी भावनिक साद घालणाऱ्या दहिसरच्या पवार कुटुंबीयांना मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास दिलासा दिला आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या विशेष अधिकारात दिलेल्या या परवानगीला हायकोर्टानं तूर्तास स्थगिती दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे यावर गुरुवारी सुनावणी झाली. दहिसर पूर्व येथील मराठा कॉलनीत राहणाऱ्या चैतन्य पवार यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पवार कुटुंबीय हे गेल्या 100 वर्षांपासून इथं स्थायिक आहेत. सध्या त्यांची चौथी पिढी इथं राहत आहे. चैतन्य यांच्या आजोबांनी आंबा, पिंपळ अशी काही झाडं आपल्या घराच्या आसपास लावली होती. यातील काही झाडं ही 80 वर्ष जुनी असली तरी आजही दिमाखात उभी आहेत. या परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामानंतरही रस्त्यालगदची काही पूर्ण वाढ झालेली 13 डेरेदार झाडं तोडण्याची मुंबई महानगरपालिकेनं परवानगी दिली होती. मात्र गेल्या अनेक दशकांपासून ही डेरेदार झाडं इथं शीतल छाया देण्याचं काम करतात. रस्तारुंदीचं काम पूर्ण झालं असल्यानं या झाडांचा वाहतुकीस तितकासा त्रास होणार नाही असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. यासंदर्भात पालिकेचं वॉर्ड ऑफिस आणि पालिका आयुक्तांना वारंवार विनंती पत्र पाठवूनही काहीच उपयोग झाला नाही, तेव्हा अखेरीस पवार कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget