एक्स्प्लोर

लग्नापूर्वी पतीने बलात्कार केलेला, घटस्फोटानंतर पत्नीची तक्रार, न्यायालयाने पत्नीला फटकारलं

2013 मध्ये आपल्याला ज्यूसमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार महिलेने केली होती. या प्रकरणी आरोपीने लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर पुढच्याच वर्षी दोघांनी विवाह केला आणि त्याच वर्षी पतीने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला. या दाव्याला पत्नीनेही सहमती दिली होती.

मुंबई : बलात्काराच्या कायद्याचा गैरवापर होत असल्याचं मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीने केलेल्या बलात्काराच्या आरोपातून पतीला दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. बलात्काराच्या घटनेनंतर पतीने लग्नाचे आश्‍वासन दिले होते, अशी कबुली पत्नीनेच दिली आहे. तसंच हे लग्न झालं त्याचवर्षी दोघांचा घटस्फोटही झाला आणि त्यानंतर बलात्काराची तक्रार घटनेच्या दोन वर्षांनंतर दाखल केली गेली. घटनाक्रमावरुन पतीविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप सिद्ध होत नाही, असं मत हायकोर्टाने यावेळी व्यक्त केलं. सत्र न्यायालयाने या प्रकरणातील घडामोडी जर विचारात घेतल्या असत्या, तर बलात्काराच्या कायद्याचा गैरवापर होत असल्याचं त्यांच्याही निदर्शनास आलं असतं, असंही निरीक्षण हायकोर्टाने यावेळी नोंदवलं. त्यामुळे घटस्फोटित पतीच्या विरोधात कलम 376 आणि 417 नुसार पत्नीने दाखल केलेले आरोप रद्द करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. या प्रकरणातील दोघांचं एकमेकांवर पाच वर्षांपासून प्रेम होते. 2013 मध्ये आपल्याला ज्यूसमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार महिलेने केली होती. या प्रकरणी आरोपीने लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर पुढच्याच वर्षी दोघांनी विवाह केला आणि त्याच वर्षी पतीने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला. या दाव्याला पत्नीनेही सहमती दिली होती. त्यामुळे विशेष विवाह कायद्यानुसार चार वर्षांपूर्वी सहमतीने हा घटस्फोट मान्य झाला. त्यानंतर पुढच्या वर्षी महिलेने पतीविरोधात दोन वर्षांपूर्वी केलेल्या बलात्कार आणि लग्नाचं अमिष देऊन केलेल्या फसवणुकीची तक्रार विक्रोळी कोर्टात केली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल करुन खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग केला. त्यानंतर आरोपीने दोषमुक्तीसाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर पतीने हायकोर्टात यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget