एक्स्प्लोर

नालासोपाऱ्यातील जोगिंदर राणा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ वाटत नाही | हायकोर्ट

मुंबई उच्च न्यायालयानं पालघर पोलिसांना यासंदर्भात गांभिर्याने भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई | नालासोपारात झालेलं 'ते' एन्काऊंटर नक्की खरं होतं का? कारण पोलिसांची ही कारवाई स्वसंरक्षणार्थ होती असं सध्यातरी वाटत नाही. असं मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं पालघर पोलिसांना यासंदर्भात गांभिर्याने भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. कारण या संदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं पोलिसांच्या एकंदरीत भुमिकेवर अनेक सवाल उपस्थित केलेत. नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीत पालघर विभागाचे एसपी गौरव सिंग हेदेखील सुनावणीसाठी कोर्टापुढे हजर होते. पोलिसांच्यावतीनं 'त्या' दोन पोलिसकर्मींनी सांगितलेला घटनाक्रम आणि वैद्यकीय प्रमाणपत्रं जुळत नसल्याचं महत्त्वपूर्ण निरिक्षण न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं नोंदवलं. सरकारी वकिलांनी यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतल्यानं हायकोर्टानं ३० ऑक्टोबरपर्यंत ही सुनावणी तहकूब केली आहे. नालासोपारा येथे 23 जुलै रोजी पोलीस चकमकीत ठार झालेल्या जोगिंदर राणा याला बनावट चकमकीत मारल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात अैड. दत्ता माने यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या केलेली ही चकमक खोटी होती आणि पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या त्याची हत्या केल्याचा आरोप त्याचा भाऊ सुरेंद्र राणा यानं याचिकेत केला आहे. मनोज सकपाळ आणि मंगेश चव्हाण या दोघांवर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात यावा, या दोघांसह त्यांच्या वरीष्ठ पोलीस अधिका-यांचे मोबाईल लोकेशन, सीडीआर तपासण्यात यावेत. या घटनेची सीबीआय अथवा एसआयटीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही हायकोर्टाकडे करण्यात आलीय. जोगिंदर राणाने पोलीस हवालदारावर चाकूने हल्ला केला, असे पोलीस सांगतात. जर माझ्या भावाने चाकूने हल्ला केला तर चाकूला रक्त का लागले नव्हते?, हल्ल्यात पोलीस हवालदार मनोज सकपाळ जखमी होऊन अतिदक्षता विभागात दाखल असल्याचे पोलीस सांगतात. मात्र तो छायाचित्रात घटनास्थळी उभा आहे, बुटाची लेस बांधत असताना दिसत आहे. तसेच मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ या दोघांनीच राणाचा मृतदेह रिक्षात घालून नेतानाचे पुरावेही सादर केले आहेत असे अैड. माने यांनी हायकोर्टाला सांगितले. तसेच या घटनेनंतर पोलिसांनी त्या परिसरातील दुकानदारांना धमकावून सीसीटिव्ही फुटेज डिलिट करण्यास भाग पाडल्याचा आरोपही या याचिकेतून करण्यात आला. त्यादिवशी या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी आधी राणाकडे पैशांची मागणी केली. आणि त्यानं पैसे देण्यास नकार करत प्रतिकार केला तेव्हा गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. असा आरोपही याचिकेतून करण्यात आलाय. जोगिंदर राणा ऊर्फ गोपाल राणा याची नालासोपारा पूर्वेच्या राधानगर इथं २३ जुलै २०१८ ला पोलीस चकमकीत हत्या करण्यात आली. राणा हा सराईत गुंड होता. त्याच्यावर वांद्रे, खार, सांताक्रूझ, जुहू, कांदिवली आणि अर्नाळा पोलीस ठाण्यात ३७ गुन्हे दाखल होते. त्यात चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांचा समावेश होता. त्यातील बहुतांश गुन्ह्यांत तो शिक्षा भोगून आला होता. विरारमधील अर्नाळा पोलीस ठाण्यातही त्याच्यावर एक गुन्हा दाखल होता.

महत्त्वाच्या बातम्या

बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget