एक्स्प्लोर

पेंटिंग्जच्या लिलावाविरोधात हायकोर्टात आलेल्या नीरव मोदीच्या कंपनीला दिलासा नाही, लिलाव सुरुच राहणार

सध्या सुरु असलेल्या या लिलावाच्या प्रक्रियेस कोणतीही स्थगिती हायकोर्टानं दिलेली नाही. न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे यावर बुधवारी सुनावणी झाली.

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या हिरेव्यापारी नीरव मोदीला मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्याच्या मालकीच्या तब्बल 68 महागड्या पेंटिंग्जच्या लिलावाला स्थगिती देण्याची मागणी करत नीरव मोदीच्या कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 1  एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र तोपर्यंत सध्या सुरु असलेल्या या लिलावाच्या प्रक्रियेस कोणतीही स्थगिती हायकोर्टानं दिलेली नाही. न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे यावर बुधवारी सुनावणी झाली. 'कॅमेलॉट एंटरप्रायझेस'च्यावतीने करण्यात आलेल्या या याचिकेत लिलावाला परवानगी देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. 'सॅफ्रन ऑर्ट' या कंपनीमार्फत या पेंटिंग्जचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. मात्र एकूण 68 पेंटिंग्जपैकी केवळ 19 पेटिंग्ज याच नीरव मोदीच्या मालकीच्या आहेत. अन्य पेंटिंग्जची मालकी अन्य कंपनींकडे आहेत, असा दावा या याचिकेमध्ये केला आहे. आयकर विभागाकडे मोदीची सुमारे 95 कोटी रुपयांची थकबाकी असून या वसुलीसाठी पेंटिग्जचा लिलाव करण्याची परवानगी मुंबईतील पीएमएलए कोर्टानं दिली आहे. सध्या या पेंटिंग्जचा ताबा अमंलबजावणी संचालनालयाकडे आहे. चित्रकार राजा रविवर्मा, व्ही एस गायतोंडे, एम.एफ. हुसैन, अकबर पदमसी आदी नामवंत कलाकारांच्या या पेंटिग्ज असून त्याची किंमत काही कोटी रुपयांमध्ये असण्याची शक्‍यता आहे. याचबरोबर मोदीच्या 11 आलिशान गाड्यांचा लिलाव करण्याची परवानगीही विशेष न्यायालयाने दिली आहे. नीरव मोदीला सध्या लंडनमध्ये अटक करण्यात आले असून भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
Maharashtra Goverment On Student Protest: महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget