एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भर स्टेजवरुन हाजी अराफत शेख यांचा दिवाकर रावतेंना घरचा आहेर

परिवहन मंत्र्यानी गेल्या तीन वर्षांत रिक्षा चालकांसाठी एक स्टॅण्ड तरी बांधला का?, असा थेट निशाणा हाजी अराफत शेख यांनी दिवाकर रावतेंवर केला.

मुंबई : शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांनाच घरचा आहेर दिला आहे. शिव वाहतूक सेनेच्या मेळाव्याच्या व्यासपीठावरुन परिवहन मंत्री दिवाकर रावतेंवर शेख यांनी तुफान टीका केली. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हेही उपस्थित होते. परिवहन मंत्र्यानी गेल्या तीन वर्षांत रिक्षा चालकांसाठी एक स्टॅण्ड तरी बांधला का?, असा थेट निशाणा हाजी अराफत शेख यांनी दिवाकर रावतेंवर केला. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘सामना’तील आदेशानुसार पक्षातील सर्व वाहतूक संघटनांचे नेतृत्व माझ्याकडे देण्यात आले आहे. मात्र, पक्षात उद्धव ठाकरे यांचे आदेश मानले जातात का? माझ्याच कार्यकर्त्यांना पक्षातले लोक मारहाण करतात. परिवहन मंत्री दिवाकर रावते माझा जातिवाचक उल्लेख करतात आणि माझ्या समर्थकांना भेटणं टाळतात.”, असे गंभीर आरोपही हाजी अराफत शेख यांनी केले. मी शिवसेनेतच राहीन. पण संघटनेत जर माझं ऐकलं जाणार नसेल, तर शिव वाहतूक संघटनेचं अध्यक्षपद यापुढे माझ्याकडे नको, असेही हाजी अराफत शेख यांनी स्पष्ट केले. यावेळी हाजी अराफत शेख यांच्या स्फोटक भाषणानंतर शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. शिवाय, उद्धव ठाकरे यांच्यापुढे बाजू मांडण्याचं खोतकर यांनी शेख यांना आश्वासनही दिलं. दरम्यान, येत्या 19 तारखेला उद्धव ठाकरेंसोबत हाजी अराफत शेख यांची चर्चा होणार आहे. यातून काय पुढे येतं, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Embed widget