मुंबई : मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्या 'मिशन ऑल आऊट' संकल्पनेला चांगलं यश मिळालं आहे. 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आपापल्या कार्यक्षेत्रात असतील. गुन्ह्याचा तपास, आरोपीचा शोध, नवीन गुन्हे घडू नये याची खबरदारी ही सर्व कामे 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत करण्यात आली.
मुंबई पोलिसांकडून 'मिशन ऑल आऊट' राबवण्यात येत असून ज्या अंतर्गत मुंबईमधील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल. 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत मुंबई पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात दक्ष मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्या 'मिशन ऑल आऊट' संकल्पनेला चांगलं यश राहिले आणि जास्तीत जास्त कारवाई केली.
मिशन अंतर्गत पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई (कारवाईचा कालावधी 23.12.2020 रात्री 11 पासून ते 24.12.2020 रोजी 2 वाजेपर्यंत)
- यामध्ये गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवर असलेले 1448 गुन्हेगार तपासले, त्यापैकी 238 आरोपी सापडले आणि 96 आरोपींवर कारवाई करण्यात आली.
- एनडीपीएस कायद्यांतर्गत गांजा सेवन संदर्भात एकूण 9 कारवाया करण्यात आल्या तर 715 हॉटेल्स, लॉज आणि मुसाफिरखाण्याची तपासणी केली.
- 112 ठिकाणी नाकाबंदी दरम्यान 7426 वाहनांची तपासणी करण्यात आली
- 213 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.
- 14 अवैध शस्त्र जप्त करण्यात आले, यामध्ये धारदार शस्त्र, 1 गावठी कट्टा, 1 देशी रिव्हॉल्वरचा समावेश आहे.
- 27 अजामीनपात्र वॉरंटची बजावणी केली.
- 439 महत्त्वाच्या ठिकाणी पायी गस्त आयोजित करण्यात आली.
- 33 फरार आणि वॉण्टेड आरोपींना अटक करण्यात आली.
- तडीपार केलेले 10 आरोपी पुन्हा हद्दीत आढळल्याने त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
'मिशन ऑल आऊट' याला चांगलाच प्रतिसाद मिळत असून लोकांकडूनही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केलं जातं आहे. यामुळे लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये अधिक जवळीक निर्माण होत आहे जे एक चांगलं चिन्ह आहे. येत्या काळात अशाप्रकारचे उपक्रम राबवण्यात येतील अशी आशा मुंबईतर व्यक्त करत आहेत.