एक्स्प्लोर

आज रात्री 8 पर्यंत रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू : सरकार

मुंबई : 'आज रात्री 8 पर्यंत कामावर रुजू व्हा, नाहीतर सहा महिन्यांचा पगार कापला जाईल,' असा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारने मार्डच्या डॉक्टरांना दिला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज सामूहिक रजेवर असलेल्या सर्व डॉक्टरांना तंबी दिली आहे. निवासी डॉक्टरांनी कामावर यावं, रुग्णाचे हाल होत आहे. त्यांच्या जीवाशी आम्ही खेळू शकत नाही. सुरक्षा पुरवण्याचं लेखी आश्वासनं दिलं आहे. तसंच सुरक्षेची मागणी एका महिन्यात पूर्ण करु असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने कामावर रुजू व्हावं, असं गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान, डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधात आता कारवाईला सुरुवात झाली आहे. नागपूरच्या सरकारी रुग्णालयातील 370 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. तर सोलापुरात 114 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत रजेवर गेलेल्या डॉक्टरांना नोंदणी रद्द करण्याची ताकीद देण्यात आली आहे. तर पुण्यातील 200 डॉक्टरांना नोटीस धाडण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या सामूहिक रजेत सहभागी झाल्याचा ठपका डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे. हायकोर्टाने खडसावूनही पुण्याच्या ससून रुग्णालयात अजूनही 200 डॉक्टर सामूहिक रजेवर आहेत. तर मुंबईत सामूहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांना आरोग्य विभागाच्या संचालकांनी नोटीस बजावली. कामावर रुजू न झाल्यास डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. न्यायालयाने डॉक्टरांना खडसावलं मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी निवासी डॉक्टरांना फटकारलं. एखाद्या कामगाराप्रमाणे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर डॉक्टर संपाचं हत्यार उपसत असेल तर त्यांचं वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारं आहे, असं निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लोळ यांनी नोंदवलं. काय आहे प्रकरण? सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे. आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे. मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय? – डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा – डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी – निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा – सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा संबंधित बातम्या नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस, संपाविरोधात हायकोर्टात सुनावणी राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
मोठी बातमी! कोयनेचं पाणी भागवणार मुंबईकरांची तहान, तब्बल 67 TMC नवीन पाणीसाठी उपलब्ध होणार, पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करणार, नेमका काय आहे निर्णय?
मोठी बातमी! कोयनेचं पाणी भागवणार मुंबईकरांची तहान, तब्बल 67 TMC नवीन पाणीसाठी उपलब्ध होणार, पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करणार, नेमका काय आहे निर्णय?
Marathi Gaurav Awards : विचारे प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव! क्रीडा अन् पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांचा 'मराठी गौरव पुरस्कारा'ने सन्मान
विचारे प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव! क्रीडा अन् पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांचा 'मराठी गौरव पुरस्कारा'ने सन्मान
Devendra Fadnavis And Sadhguru: राजकारण्यांना अधिक चांगले नेतृत्व आणि माणूस बनण्यासाठी कोणता एक सल्ला द्याल?, फडणवीसांचा प्रश्न; सद्गुरू म्हणाले...
राजकारण्यांना अधिक चांगले नेतृत्व आणि माणूस बनण्यासाठी कोणता एक सल्ला द्याल?, फडणवीसांचा प्रश्न; सद्गुरू म्हणाले...

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Embed widget