एक्स्प्लोर

कोकणची वाट लावणारे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न : राज ठाकरे

मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे बोलत होते.

मुंबई : विध्वसंक प्रकल्प कोकणात आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतीयांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तुम्ही तुमच्या जमिनी देऊ नका, तुम्ही सावधान राहा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे. मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे बोलत होते. जमीन हातातून गेली की अस्तित्त्व संपलं कोकणातील जमिनीबाबत राज ठाकरे म्हणाले की,  "ही भूमी आपली आहे. कोकणासारख्या पवित्र भूमीकडे आपलं दुर्लक्ष होतंय. त्यामुळे बाकीचे इथे घुसत आहेत. आमचे लोक जमिनी विकून मोकळे होत आहेत. पण एकदा जमीन हातातून गेली की तुमचं अस्तित्व संपलं. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आपल्याला आपल्या भूमीचं महत्त्व समजलेलं नाही. त्या जमिनीकडे तुम्हाला लक्ष द्यावच लागेल. कोकणाची वाट लावणारे प्रकल्प आणण्याचे प्रयत्न अनेक आमदार, खासदार तिथून आले. कोकणाची वाट लागू शकते, असे प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोकणाची जमीन ही त्यासाठी नाही, ते प्रकल्प दुसरीकडे हलवता येतात. कोकणची भूमी हे केरळसारखीच आहे. पर्यटनात केरळच पुढे जाऊ शकतो, मग आपलं कोकण का नाही? पण हा विचार करतच नाही. या गोष्टी करण्यासाठी राजकीय बळ लागतं, असंही राज ठाकरे यांनी सुनावलं. एकट्या दापोलीत चार भारतरत्न या भूमीने आतापर्यंत काय काय दिलं. देशातल्या अनेक राज्यांमधून भारतरत्न देतात. महाराष्ट्राला जी आठ भारतरत्न मिळाली आहेत. पा वा काणे, धोंडू केशव कर्वे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी आणि  जे आर डी टाटा महाराष्ट्रातल्या या मान्यवरांना भारतरत्न मिळाला आहे. त्यापैकी एकट्या दापोली तालुक्यात चार भारतरत्न आहेत. ज्या कोकणाने भारताला महान माणसं दिली आहेच आणि आम्ही फक्त गणपतीला गावाला जाऊन येतोय, असं राज ठाकरे म्हणाले. रस्ते कंत्राटदारांना आपल्या पद्धतीने जाब विचारा मुंबई-गोवा हायवेवरील अवस्थेवरुन राज ठाकरे म्हणाले की, "कोकणात नवीन रस्ते बांधले आहेत म्हणे. जेवढे नवीन रस्ते बांधले ते उखडले आहेत. गणपतीला गावाला जाताना तुमच्या मणक्यांना कळेलच ते. आज हजारो रुपये कोटी खर्च करतायत, आपण कुठे रस्ते बांधतोय, याचं भान नाही. फक्त पैसे खर्च केले जातात. रस्ते बांधले जात आहे. पाऊस पडला, दरडी कोसळल्या की आमचे रस्ते खराब, खड्डे पडायला सुरुवात. या रस्त्यांचे कंत्राटदार कोण आहे, याचा जाब तुम्ही आपल्या पद्धतीने विचारायला हवा. हजारो कोटी खर्च केले जातात ते काय कंत्राटदार आणि राजकारण्यांच्या घशात घालण्यासाठी? नुसते आकडे फेकले जात आहेत, कामं होत नाही." राज ठाकरेचं संपूर्ण भाषण

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget