एक्स्प्लोर

आरक्षण, दुष्काळ, आदिवासींबाबत सरकार ठगबाजी करतेय : विखे पाटील

आरक्षणाची मागणी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट अनुदान तसेच आदिवासीच्या समाजाच्या मागण्यांबाबत सरकार वेळकाढूपणा आणि ठगबाज करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. विखे पाटील यांनी हे सर्व मुद्दे विधानसभेत उपस्थित केले.

मुंबई : विविध समाजांची आरक्षणाची मागणी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट अनुदान तसेच आदिवासीच्या समाजाच्या मागण्यांबाबत सरकार वेळकाढूपणा आणि ठगबाज करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. विखे पाटील यांनी हे सर्व मुद्दे विधानसभेत उपस्थित केले. ते म्हणाले की, मार्च महिन्यात नाशिकहून आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघाला होता. वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती दया, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा आदी मागण्या त्या मोर्चातून करण्यात आल्या होत्या आणि त्यावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र आज 8 महिन्यानंतरही त्या मागण्यांवर सरकारने अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे आदिवासी समाजाला लाँग मार्च प्रमाणेच आज हजारो आदिवासींना हालापेष्टा सहन करून लोकसंघर्ष मोर्चा काढावा लागला. सरकारने आदिवासी समाजाच्या संयमाची अधिक परीक्षा पाहू नये, असे सांगून विरोधी पक्षनेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. आदिवासी समाजाचा लोकसंघर्ष मोर्चा आझाद मैदान येथे पोहचल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील तिथे गेले व मोर्चेकऱ्यांशी चर्चा करून आंदोलनात सहभागी झाले. दुष्काळ व आरक्षणांचा प्रश्नही त्यांनी सभागृहात लावून धरला. ते म्हणाले की, दुष्काळग्रस्तांना सरसकट 50 हजार हेक्टरी तर फळबागांना 1 लाख रूपये हेक्टरी मदत देण्याच्या मागणीसंदर्भात सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. सरकारने दुष्काळ अगोदरच जाहीर केला आहे. त्यामुळे आता दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर करणे अधिक गरजेचे आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि धनगर आरक्षणासंदर्भात 'टीस'चा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची मागणीही त्यांनी लावून धरली. राज्य सरकार उच्च न्यायालयात राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी मान्य केल्याचे सांगते. पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगते. पण हा अहवाल सभागृहात मांडून सरकारने नेमकी काय कार्यवाही करते आहे, त्याची माहिती का दिली जात नाही, असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला. धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी फिरवल्याचा आरोपही त्यांनी केला. इतर मागासवर्गियांच्या 52 टक्के आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे 16 टक्के आरक्षण द्यावे, या मागणीचा पुनरूच्चार त्यांनी केला. उच्च न्यायालयाने मंजूर केलेले मुस्लीम समाजाचे ५ टक्के आरक्षण लागू करण्याबाबत मागील ४ वर्षात या सरकारने कोणतीही पावले का उचलली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision: मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Sunetra Pawar: जनता दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रा पवार यांची तत्काळ दखल, थेट पुणे पोलीस आयुक्तांना फोन अन्....
जनता दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रा पवार यांची तत्काळ दखल, थेट पुणे पोलीस आयुक्तांना फोन अन्....
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; अंतरवाली सराटीमधील उपोषणाची जागा सोडली, गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...
मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; अंतरवाली सराटीमधील उपोषणाची जागा सोडली, गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Murlidhar Mohol : पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला दुचाकीवरुन कट मारला, 32 वर्षीय तरुण अडकला; मध्यरात्री पोलिस घरात धडकले, नेमकं काय घडलं?
पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला दुचाकीवरुन कट मारला, 32 वर्षीय तरुण अडकला; मध्यरात्री पोलिस घरात धडकले, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Protest: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच पत्नीसह मुली संतापल्या; म्हणाल्या, 'वडिलांना काही झाल्यास डोळे पुसायला रुमाल...'
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच पत्नीसह मुली संतापल्या; म्हणाल्या, 'वडिलांना काही झाल्यास डोळे पुसायला रुमाल...'
Maharashtra Goverment Cabinet Decision: मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले
Manoj Jarange Patil Mumbai : मनोज जरांगे मुंबईला निघताच समर्थक अन् नागरिकांची गर्दी; चोरट्याने मोबाईल, पैशांवर मारला डल्ला; आंदोलकांनी रंगेहाथ पकडून चोपलं
मनोज जरांगे मुंबईला निघताच समर्थक अन् नागरिकांची गर्दी; चोरट्याने मोबाईल, पैशांवर मारला डल्ला; आंदोलकांनी रंगेहाथ पकडून चोपलं
Rohit Patil: 'दुष्काळाचे संकट दूर होऊ दे अन्...', अंजनी ते तासगाव पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी रोहित पाटलांचं साकडं
'दुष्काळाचे संकट दूर होऊ दे अन्...', अंजनी ते तासगाव पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी रोहित पाटलांचं साकडं
Rain Update: बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
Sangali News: अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
Embed widget