मुंबई: गोरेगावमधील जय भवानी इमारतीच्या (Goregaon Fire) पार्किंगमध्ये मध्यरात्री तीनच्या आसपास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून आगीमुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही, असा दावा मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांनी केला आहे. सगळे मृत्यू हे सगळे मृत्यू गुदमरल्यामुळे झालेत. धुरात गुदमरून लोकांचा मृत्यू झाला आहे, असे इक्बालसिंह चहल म्हणाले.
मुंबईच्या गोरेगावमधील जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आग दुर्घटनेती चौकशी सात दिवसांच्या आत पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहे. पार्किंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागलीअसल्याचा प्राथमिक अंदाज फायर ब्रिगेडकडून व्यक्त करण्यात आला आहे. पार्किंगमध्ये ठेवलेल्या कपड्यांच्या गाठोड्याला आग लागल्यानं आग जास्त पसरत गेल्याचे इकबाल सिंह चहल म्हणाले
बीएमसीकडून चौकशी होणार
गोरेगावमधील जय भवानी इमारत ही एसआरएची होती. मग एसआरए इमारतीची मॅनेजमेंट कमिटी कार्यरत होती का? आग विरोधी यंत्रणा कार्यरत होती का? फायर एक्झिटमधून रहिवासी जलद गतीनं बाहेर का पडू शकले नाहीत?. पार्किंगमध्ये कपड्यांच्या गाठोडे ठेवण्याची परवानगी कुणी दिली? बीएमसीकडून सदर इमारतीचे फायर ऑडीट कधी झाले होते? याची देखील चौकशी बीएमसीकडून होणार असल्याची माहिती इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
मृतांमधे बहुतांश कचरावेचक नागरिक
आतापर्यंत या आगीत लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत्यू गुदमरल्यामुळे झाले आहेत. मृतांमधे बहुतांश कचरावेचक नागरिक आहे. कारण इमारतीत जास्तीत जास्त लोक कचरावेचक होते. त्यांनी गोळा केलेला कचरा खाली रचून ठेवला होता. ज्यामुळे आग जास्त भडकली. इमारतीतील फायर सेफ्टीच्या गोष्टींची तपासणीही केली जाईल. प्लास्टिक सर्जरीसाठी चार रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात येत आहे. त्यात दोन मुले, दोन नागरिकांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सरकार चार लाख रुपयांची भरपाई देणार आहे. धुरात गुदमरून लोकांचा मृत्यू झाला आहे.
जखमींवर सध्या कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या भीषण आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी आणि चार कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. दरम्यान आग लागलेल्या इमारतीमधील सर्व रहिवाशांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्याची सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा: