कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकात (Kalyan Railway station accident) भीषण दुर्घटना घडली.  पुण्याहून मुंबईकडे (Pune Mumbai railway) येणाऱ्या डेक्कन क्वीन (Deccan queen express ) एक्स्प्रेसमधून उतरताना, दोघेजण खाली कोसळले. यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. मृत आणि जखमी दोघेही भाऊ भाऊ असल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास कल्याण स्टेशनवर ही भीषण दुर्घटना घडली.  सुरुवातील एक्स्प्रेस पकडताना ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र एक्स्प्रेसमध्ये चढताना नाही तर उतरताना हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.


धावत्या लोकलमधून उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न


डेक्कन क्वीन एक्स्प्रेस कल्याण स्थानकात थांबत नाही.या स्थानकावर एक्स्प्रेसचा वेग काहीसा कमी होतो. मात्र धावती एक्सप्रेस पकडण्याचा किंवा त्या एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न असंख्य प्रवासी करतात. त्यात अनेकवेळा दुर्घटना होतात. आजही नेमकं तसंच घडलं.पुण्यावरुन आलेले दोन भाऊ कल्याण स्थानकात उतरण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी ते दोघेही खाली कोसळले. त्यात एकाचा जीव गेला. 


नेमकं काय घडलं?


पुण्यावरुन मुंबईकडे येणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस सकाळी 9.30 च्या सुमारास कल्याण स्टेशनवर आली. यावेळी या रेल्वेचं स्पीड कमी झालं. त्यादरम्यान काही प्रवाशांनी एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा तर काहींनी उतरण्याचा प्रयत्न केला. या एक्स्प्रेसबाबत हा प्रकार नेहमी घडतो. आजही तसाच प्रयत्न पुण्यावरुन आलेल्या दोन भावांनी केला. कल्याण स्टेशनवर उतरताना दोघेही खाली कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. दरम्यान या दुर्घटनेनंतर स्टेशनवरील हमालांनी जखमीला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकारानंतर रेल्वे स्टेशन परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळाला. नेमकं काय घडलं हे कोणाला समजत नव्हतं. 


रेल्वे पोलीस घटनास्थळी


दरम्यान, या दुघटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, जीआरपीएफ यांन घटनास्थळी धाव घेतली. शिवाय ही सर्व दुर्घटना प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्हीतही कैद झाला आहे.  याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.


चाकरमान्यांची गर्दी


दरम्यान, सकाळी कामावर जाण्याच्या वेळीच ही दुर्घटना घडल्याने कल्याण स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर एकच गर्दी पाहायला मिळाली. एकीकडे चाकरमान्यांची कामावर जाण्याची धावपळ, दुसरीकडे दुर्घटना त्यामुळे कल्याण स्टेशन परिसरात काहीसं तणावाचं वातावरण होतं.  दरम्यान, एक्सप्रेसमधून पडून ही दुर्घटना झाली असली, तरी लोकल वाहतुकीवर काहीसा परिणाम झालेला नाही. 


VIDEO : कल्याण स्टेशनवर नेमकं काय घडलं?