Goregaon Film City Mumbai : मुंबईचा गोरेगाव फिल्म सिटीमध्ये (Goregaon Film City)  भिंती कोसळून 2 जणांचा मृत्यू तर 4 ते जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये भिंतीचे बांधकाम करणाऱ्या दोन कामगारांचा  जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.24) संख्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 


दोन कामगारांचा जागेवरच मृत्यू 


अधिकची माहिती अशी की, फिल्मसिटीच्या आतमध्ये प्राईम फोकस स्टुडिओच्या (Prime Fox Production) जवळ 25 ते 30 फुटाची भिंती बांधण्याच्या बांधकाम सुरु आहे. हे काम सुरु असतानाच सात वाजताच्या सुमारास भिंत कोसळली.  भिंतीचे बांधकाम करणाऱ्या दोन कामगारांचा जागेवरच मृत्यू झाला. तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.






अग्नीशामक दलाकडून बचावकार्य सुरु 


घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस मुंबई महानगरपालिकेची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. शिवाय अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Shrikant Shinde on Aaditya Thackeray : आपली योग्यता काय, संबंध काय, बोलतो काय? आदित्य ठाकरेंच्या राजीनामा मागणीवर श्रीकांत शिंदेंची टीका