मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गोरेगावतील (Goregoan) दुर्घटनास्थळाची पाहणी केली. पण यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटू न दिल्याने नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री पाहणी करुन गेल्यानंतर नागरिकांनी एकच गोंधळ केला. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू न दिल्याने हे नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात यामध्ये जखमी झालेल्यांची भेट घेतली. तसेच त्यांची विचारपूस देखील करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. त्यांनी घटनास्थळाची देखील पाहणी केली. पण यावेळी नागरिक मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
नागरिक आक्रमक का झाले?
गोरेगावतील ज्या इमारतीमध्ये आग लागली त्या ठिकाणीची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी तिथल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायचा होता. पण त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ दिली नाही. त्यामुळे नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला. तर जोपर्यंत आमच्याशी इथे येऊन कोणी संवाद साधत नाही, तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही अशी भूमिका या नागरिकांनी घेतली. पण पोलिसांनी त्यांना तुमच्याशी तुमचे स्थानिक प्रतिनिधी येऊन संवाद साधतील असं म्हटलं. पण तरीही हे नागरिक काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
मुख्यमंत्र्यांनी घेतली जखमींची भेट
गोरेगावातील इमारीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये अनेकांचा होरपूळ मृत्यू झाला. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जखमींची कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच यावेळी त्यांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं. पण एसआरएच्या सर्व इमारतींचे ऑडीट होणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीये.
कुटुंबियांना मदत जाहीर
दरम्यान गोरेगावात इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झालीये. तर जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोलिस अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. स्क्रॅपमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांच्या परिवाराला शासनाकडून पाच लाखांची मदत करण्यात येणार आहे. जखमींचा उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे .