एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई विमानतळावर 63 लाखांचं दोन किलोपेक्षा जास्त सोनं जप्त
मुंबई : मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानातून दोन किलोपेक्षा जास्त सोनं जप्त करण्यात आलं आहे. एअर इंटेलिजन्स युनिटनं दुबईवरुन येणाऱ्या विमानातून हे सोनं ताब्यात घेतलं आहे.
जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास 63 लाख इतकी आहे. विमानाच्या सीटमधल्या एका पोकळ पाईपमधून हे सोनं बेकायदेशीररित्या भारतात आणलं जात असल्याची महिती मिळाली होती. त्यानुसार एअर इंटेलिजन्स विभागानं ही कारवाई केली.
प्रत्येकी 116 ग्रॅमची 20 सोन्याची बिस्किटं आणि एक सोन्याचं नाणं या कारवाईत जप्त करण्यात आलं. मात्र या प्रकरणी अद्याप कुणाविरोधातही गुन्हा दाखल झालेला नाही.
मुंबई विमानतळावर 54 लाखांची 18 सोन्याची बिस्किटं जप्त
शनिवारीच मुंबई विमानतळावर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी उघड झाली होती. कारवाईत एकूण सुमारे 65 लाख किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं. दुबईहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून प्रत्येक एक तोळे वजनाची 18 सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली होती. या बिस्किटांची किंमत जवळपास 54 लाख 67 हजार रुपये इतकी होती. दुसऱ्या कारवाईत बँकाकहून आलेल्या प्रवाशाकडून सोन्याची चेन, ब्रेसलेट असे 8.75 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी विमलेश पांचाल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.मुंबई विमानतळावर 2 कारवायांमध्ये 40 कोटींचं सोनं जप्त
शुक्रवारीही मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या दोन कारवाईत 40 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणी एकूण चार आरोपींना कस्टम विभागानं ताब्यात घेतलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement