एक्स्प्लोर

''त्या' कुमारी मातेच्या बाळाला वडिलांच्या नावाविना जन्मदाखला द्या''

मुंबईतील एका 22 वर्षीय अविवाहीत तरुणीने मुलाच्या जन्मदाखल्यावरील पित्याचं नाव काढून टाकण्याची मागणी केली होती. या याचिकेची दखल घेत हायकर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

मुंबई : 'त्या' कुमारी मातेच्या बाळाला पित्याच्या नावाचा कॉलम रिकामा ठेवून जन्मदाखला द्या, असे निर्देश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. हा महत्त्वपूर्ण निकाल देताना हायकोर्टाने सुप्रीम कोर्टातील या संदर्भातील एका निकालाचा आधार घेतला. कुमारी मातेला जन्मदाखल्यावर जन्मदात्या पित्याचं नाव देण्याची सक्ती का? असा सवाल करत मुंबई हायकोर्टात एका तरुणीने याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. मुंबईतील एका 22 वर्षीय अविवाहित तरुणीने मुलाच्या जन्मदाखल्यावरील पित्याचं नाव काढून टाकण्याची मागणी केली. या तरुणीच्या दाव्यानुसार, तिने चुकून सदर पुरुषाचं नाव जन्मदात्याचं नाव म्हणून दिलं होतं. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. मागील सुनावणीत यावर हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं की, अशा प्रकारे महिलेच्या मनाप्रमाणे पित्याचं नाव काढता किंवा टाकता येणार नाही. या प्रकरणी मंगळवारच्या सुनावणीत जन्मदाखल्यात नाव असलेल्या व्यक्तिला कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले होते. सदर पुरूषाने हायकोर्टात उपस्थित राहून स्वत:चं नाव जन्मदाखल्यावरुन काढून टाकण्यास हरकत नसल्याचं लेखी हमीपत्र सादर केलं. त्या महिलेकडून महापालिकेत जन्मदाखल्यासाठी दिलेल्या अर्जात जन्मदात्या पित्याच्या नावाचा कॉलम रिकामा ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र पालिकेने ही विनंती नामंजूर करत त्या मुलीला जन्मदाखला देण्यास नकार दिला. याविरोधात महिलेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Coaching Class New Rules: शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
Youth Employment NITI Aayog Report Marathi News: देशातील 8.7 कोटी तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत; नीती आयोगाच्या अहवालात नेमकं काय काय?
देशातील 8.7 कोटी तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत; नीती आयोगाच्या अहवालात नेमकं काय काय?
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Coaching Class New Rules: शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
Imran Khan: 'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Embed widget