एक्स्प्लोर
भरधाव मालगाडी अंगावरुन जाऊनही तरुणी सुखरुप

मुंबई : देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती मुंबईतल्या कुर्ला स्थानकावर दिसून आली. भरधाव रेल्वेखाली येऊनही 14 वर्षीय मुलीचा जीव वाचल्याची घटना कुर्ला स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गुरुवारी झालेल्या या घटनेचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला. रुळ ओलांडताना एक 14 वर्षांची मुलगी वेगाने आलेल्या मालगाडीखाली आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अख्खी मालगाडी तिच्या अंगावरुन गेली. मात्र तिला काहीच इजा झालेली नाही. प्रवाशांच्या आरडाओरड्यानंतर मालगाडी थांबवण्यात आली आणि मुलीला बाहेर काढण्यात आलं. ही मुलगी प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरुन 6 कडे जात होती. मात्र अचानक मालगाडी आल्याने ही दुर्घटना घडली. गाडीने धडक दिल्याने या मुलीचा मृत्यू झाला असावा, असं प्रत्यक्षदर्शींना वाटलं. मात्र काही प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरुन पाहिलं असता, ती दोन्ही ट्रॅकच्या मधोमध सुखरूप होती. रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेलं. तेथे प्राथमिक उपचार करून तिला सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाहा व्हिडिओ :
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?






















